• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 28, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘जगी ऐसा बाप व्हावा’ व ‘नानी’  हे दोन्ही चरित्रग्रंथ म्हणजे उत्कृष्ठ “डॉक्युमेंटेशन” डॉ.मुरहरी केळे लिखित पुस्तकावरील परिसंवादात मान्यवरांचा सूर

Team OurAkola by Team OurAkola
June 4, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
‘जगी ऐसा बाप व्हावा’ व ‘नानी’  हे दोन्ही चरित्रग्रंथ म्हणजे उत्कृष्ठ “डॉक्युमेंटेशन” डॉ.मुरहरी केळे लिखित पुस्तकावरील परिसंवादात मान्यवरांचा सूर
13
SHARES
626
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :-  ‘जगी ऐसा बाप’ व्हावा’ व ‘नानी’ हे  दोन चरित्रग्रंथ चांगले डॉक्युमेंटेशन असून, उपेक्षित समाजामध्ये जन्मून सामान्यामधून असामान्य माणसे कशी होतात हे शिकविणारे, वृद्धाश्रम फोफावणार्या या काळामध्ये मातृ व पितृऋण याची शिकवण देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असा सूर रविवारी आयोजित परिसंवादात  उमटला. महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता तथा साहित्यीक डॉ.मुरहरी केळे लिखित ‘जगी ऐसा बाप’ व्हावा’ व ‘नानी’ या दोन चरित्रग्रंथावरील परिसंवादाचे आयोजन एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

अंकुर साहित्य संघ व संस्कृती प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या परिसंवादाच्या  व्यासपीठावर  अध्यक्ष लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक तथा  महात्मा जोतीराव फुले अध्यासन केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणेचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक व प्राध्यापक,मराठी विभाग,सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील मा.डॉ.मनोहर जाधव तर  भाष्य करण्यासाठी समीक्षक, वक्ते व गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तीजापूरचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत तिडके व  समीक्षक,कवी,वक्ते व विनायकराव पाटील महाविद्यालय,वैजापूर, जि. औरंगाबाद, येथील मराठी विभाग प्रमुख मा.डॉ.महेश खरात आणि   आदर्श महाविद्यालय, अकोलाचे माजी प्राचार्य बापुराव झटाले यांचेसह साहित्यीक डॉ.मुरहरी केळे, संस्कृती प्रकाशनच्या मनीषा केळे, हास्यकवी अरविंद भोंडे व उद्योजक जयसिंह चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आपण हे दोन्ही पुस्तके हे फक्त माझे आईवडील आहेत म्हणून त्यांच्यावर लिहिली नसून त्यांनी केलेले कार्य, संघर्ष व दृष्टीकोन समाजामासमोर यावा. आईवडीलांचे महत्व नव्या पिढीला समजावे हा उद्देश असल्याचे  लेखक  डॉ.मुरहरी केळे यांनी यावेळी सांगितले. या दोन्ही चरित्र ग्रंथामध्ये गुण व दोष दोन्ही सांगण्यात आले असून सत्यता व वास्तविकतेवर आधरित ही पुस्तके मानवाच्या उद्दात्त प्रवृत्तीला प्रेरणा देणारी आहेत.

सोपानराव सारख्या निरक्षर माणसाला त्यावेळी योग्य संधी मिळाली असती तर मामासाहेब दांडेकर यांचे समान उंची गाठू शकले असते असे भाष्य बापुराव झटाले यांनी केले. नानी व काका हे संघर्षातून मोठे झालेले हे दोन्ही व्यक्तिमत्त्व असून, सोपानदेव निरक्षर असून सुद्धा संतपदापर्यंतचा प्रवास नानीशिवाय शक्य नव्हता, या दोन्ही पुस्तकातून लेखकाने साहित्यिक होण्याची मान्यता मिळवण्याबरोबरच मातृ व पितृऋण फेडले असे भाष्य डॉ.श्रीकांत तिडके  यांनी केले.

ही दोन्ही पुस्तके निर्माण होण्याचे कारण लेखकावर झालेले तत्कालीन संस्कार असून या संघर्षयात्रेमुळे वैयक्तिक यशाबरोबर या दोघांना कायम जिवंत ठेवण्याचे कार्य डॉ. केळे यांनी केल्याचे भाष्य डॉ.महेश खरात यांनी केले. आई व बापाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी ही  पुस्तके म्हणजे योग्य डॉक्युमेंटेशन असून, तत्कालीन संघर्ष हेलावून टाकणारा असून समाज वाचण्याची दृष्टी सोबतच अशाप्रकारे लिखाण करण्याची प्रेरणा देणारी ही पुस्तके असल्याचे मत डॉ.मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.


‘देव पहावयास गेलो आणि देव होवूनिया गेलो’ अशाप्रकारची हि चरित्रे असून समाजाची संस्कृती व तत्कालीन चित्रण यासोबतच उपेक्षित समाजातील माणसे विदारक परिस्थितीतून श्रेष्ठत्त्वाला पोहोचण्याचे हे कार्य यामधू समाजासमोर मांडले असल्याचे मत डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडले. प्रास्ताविक अरविंद भोंडे यांनी तर सूत्रसंचालन विकास आढे व संजीवनी हिंगणे अठराळे यांनी केले. आभार डॉ प्रमोद काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत व शेवटी पसायदान राजेश्वरी जोशी यांनी गायिले. या परिसंवादाला साहित्यिक, रसिक, विविध क्षेत्रातील मान्यवर  व श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

#MeToo : १० वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं – सिंधुताई सपकाळ

Next Post

धक्कादायक!! शिर्डीत नवरा-बायकोची मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
suiside

धक्कादायक!! शिर्डीत नवरा-बायकोची मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या

दिवाळी त आतिषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

दिवाळीत आतिषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.