• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Team OurAkola by Team OurAkola
June 4, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 22 :- दोन पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे जमीनीतील आर्द्रता कमी झाली आहे. यामुळे जिल्हयात दुष्काळ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. शेतक-यांच्या शेतातील सोयाबीन , कापुस, तुरसह विविध पिकांचे उत्पन्न कमी होणार आहे. शेतक-यांवर आलेल्या या संकटातून सावरण्यासाठी शासन शेतक-यांना जास्तीत जास्त सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

मागील काही दिवसांपासून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील जिल्हयातील प्रत्येक तालुक्याला भेट देवून शेतातील पिकांची पाहणी करत आहेत. जिल्हयात सर्वच तालुक्यात दुष्‍काळ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. काही भागात जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली असल्याचे दिसून येत आहे. तसेच जमीनीला भेगा पडल्यामुळे शेतात तग धरून असलेल्या पिकांची परिस्थीती बिकट असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

आज दि. 22 ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बाळापूर तालुक्यातील निमकर्दा , मोरगाव सादीजन, अंदूरा आदि गावांना भेट देवून पिकांची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम, बाळापुरचे उपविभगीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार दिपक पुंडे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री कंडारकर, तालुका कृषि अधिकारी श्री. जांभळूणकर आदिंची उपस्थिती होती.

निमकर्दा येथील अरूण बळीराम जामोदे यांच्या शेतातील तुर पाणी नसल्यामुळे उत्पादनात कमी येणार आहे. अशीच परिस्थीती निमकर्दा मंडळामधील इतर शेतातील आहे. तसेच पावसाच्या दोन पाण्यात खंड पडल्यामुळे सोयाबीनचे अत्यंत कमी म्हणजेच एकरी दीड क्वींटल झाले असल्याचे शेतक-यांनी सांगितले. सोयाबीन तुर कपाशी आदि पिकांचे उत्पादनात घट झाली असल्याचे शेतक-यांनी पालकमंत्री यांना सांगितले. निमकर्दा येथील रितेश व प्रविण वसंतराव गव्हाणकर यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांवर लाल्या रोग आला आहे. पाणी कमी असल्यामुळे उत्पन्नात कमी येणार आहे. याच प्रकारची परिस्थीती कसुरा , अडोशी-पडोशी आदी गावातील शेतात दिसून येते.

मोरगाव सादीजन येथील मासुमशाह मेहबुबशाह यांच्या शेतातील कापसाचे पिक पाण्यात आर्द्रता नसल्यामुळे कापसाचे पाने सुकलेली आहे. तसेच पराटीचे झाडे फुलासह बोंड न फुटता मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थीती पाऊस कमी पडल्यामुळे व उन्हामुळे बाष्पीभवन झाल्यामुळे जमिनीतील आर्द्रता कमी होवून उत्पादनात कमी येत असल्याचे निर्दशनात आले. अंदूरा येथील संजय घंगाळे यांच्या शेतातील कपाशीचे पिक पाणी नसल्यामुळे एकरी 50 ते 60 किलो उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे श्री. घंगाळे यांनी सांगितले त्यांच्या शेतातील पराटीचे पाने पावसाअभावी कोमलजून गेली आहेत.

शेतक-यांचे नुकसान होवू नये म्हणून कागदपत्रे नोंदी नुसार नाही तर प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे अहवाल एकत्रीत अहवाल पाठविणार असल्याचे तसेच मा. मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांना प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. केंद्र व राज्यशासन दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमध्ये शेतक-यांना नियमानुसार जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री रणजीत पाटील यांनी निकमर्दा येथील पाझर तलावाच्या खोलीकरणाची पाहणी केली. सदर पाझर तलाव 14 एकर एरीया मध्ये पसरलेला आहे. या तलावाचे खोलीकरण व विस्तारीकरण केल्याने निमकर्दा भागातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. तसेच या भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. यामुळे या कामाला प्राधान्य दयावे असे निर्देश पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कृषि व महसुल विभागाला दिले.

बाळापूर तालुक्यातील पिक परिस्थीतीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तेल्हारा तालुक्यातील अडसुळ , उमरी, नेर, पंचगव्हाण , सांगवी हिवरे आदी गावांना भेटी देवून पिक परिस्थीतीची पाहणी केली. तेल्हारा तालुक्यात दोन पावसात खंड पडल्यामुळे व अपु-या पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. या भागातील कापुस , तुर , सोयाबीन , आदी पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. या सर्वांचा एकत्रीत अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे तसेच मा. मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांना प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. यावेळी शेतक-यांशी संवाद साधुन डॉ. पाटील यांनी शेतक-यांच्या समस्या व अडीअडचणी जाणुन घेतल्या शासन आपल्या पाठीशी असून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेतक-यांना सांगितले.

अधिक वाचा : शेतकरी बांधवाचे नुकसान होऊ देणार नाही- पालकमंत्री डाॅ. रणजीत पाटील

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

हीरो ची नवी स्कुटर Destini 125 भारतात लॉन्च

Next Post

#MeToo : १० वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं – सिंधुताई सपकाळ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
सिंधुताई सपकाळ

#MeToo : १० वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं – सिंधुताई सपकाळ

‘जगी ऐसा बाप व्हावा’ व ‘नानी’  हे दोन्ही चरित्रग्रंथ म्हणजे उत्कृष्ठ “डॉक्युमेंटेशन” डॉ.मुरहरी केळे लिखित पुस्तकावरील परिसंवादात मान्यवरांचा सूर

'जगी ऐसा बाप व्हावा’ व ‘नानी’  हे दोन्ही चरित्रग्रंथ म्हणजे उत्कृष्ठ “डॉक्युमेंटेशन” डॉ.मुरहरी केळे लिखित पुस्तकावरील परिसंवादात मान्यवरांचा सूर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.