• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Kerala nun rape case: मुख्य साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
75 4
0
Kerala nun rape case: मुख्य साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

बहुचर्चित केरळ नन बलात्कार प्रकरणातील मुख्य आणि महत्त्वाचे साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आज सकाळी जालंधरच्या दासुआ येथील एका चर्चमध्ये कुरियाकोस यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कुरियाकोस यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे.

जालंधरच्या दासुआ येथील सेंट मेरी चर्चमध्ये कुरियाकोस यांचा मृतदेह आढळला आहे. कुरियाकोस यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा सापडलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली की त्यांनी आत्महत्या केली याचं कारणं स्पष्ट होऊ शकलं नाही. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. कुरियाकोस यांनी बेडवर उल्टी केल्याचं आढळून आलं आहे. शिवाय त्यांच्या बेडवर रक्तदाबाचे औषधेही आढळून आली आहेत, असं सांगतानाच नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या कुरियाकोस यांना कोणतंही संरक्षण देण्यात आलं नव्हतं, असं सूत्रांनी सांगितलं. केरळमधील नन बलात्कार प्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर आरोप झाले होते. याप्रकरणी बिशप मुलक्कल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुलक्कल यांच्याविरोधात फादर कुरियाकोसे यांनी साक्ष दिली होती. २०१४ ते २०१६ दरम्यान बिशपने बलात्कार केल्याचा आरोप पीडित ननने केला होता. या प्रकरणी कोर्टाने बिशप मुलक्कल यांना जामीन दिला आहे.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

दरम्यान, कुरियाकोस यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांचे भाऊ जोस कट्टुथारा यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकी मिळत होती, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, कुरियाकोस यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच जोस अल्प्पेकडे रवाना झाले आहेत. याप्रकरणाची ते तक्रारही करणार आहेत. तसेच जालंधर पोलीस ठाण्यातही ते गुन्हा दाखल करणार आहेत.

अधिक वाचा : #MeToo : लैंगिक छळाच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Bishop Franco MulakkalFather Kuriakose KattutharaKerala nun rape case
Previous Post

यंदा ३०१ शेतमजुरांना विषबाधा; कीटकनाशकाचे बळी; दोन जणांचा झाला मृत्यू

Next Post

हीरो ची नवी स्कुटर Destini 125 भारतात लॉन्च

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
Destini 125

हीरो ची नवी स्कुटर Destini 125 भारतात लॉन्च

दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.