भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकाचा विश्वविक्रम मोडणार असे भाकित खुद्द सचिनने केले होते. एक दिवसीय २१२ सामन्यात विराटने ६०वे आंतरराष्ट्रीय शतक पुर्ण केले आहे.
विराट वेस्ट इंडिज विरुध्दच्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मलिकेत सचिनचे अजून एक रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती आणि ही चर्चा खरी ठरली. काल झालेल्या गुवाहाटी येथील सामन्यात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतले ६०वे तर एकदिवसीय सामन्यामध्ये ३६ वे शतक ठोकले. त्याने ८८ चेंडूतच आपले शतक पूर्ण केले. एकदिवसीय सामन्यात ६,००० धावा काढणारा विराट क्रिकेट जगतात दुसरा फलंदाज बनला.
यापूर्वी ही अशी कामगिरी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिनने केली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने २२ वे शतक झळकावले आहे. तर सचिनने लक्ष्याचा पाठलाग करताना १७ शतक ठोकली आहेत.
विराटचे ६०वे आंतरराष्ट्रीय शतक पुर्ण
विराट कोहली आंतरराष्ट्रिय सामन्यात ६०वे शतक ठोकले आहे. सर्वाधिक शतक करणार्यांच्या यादीत विराटने दुसरे स्थान मिळवले. कसोटी सामना आणि एकदिवसीय सामना मिळून ३८६ डावात ६० शतक पूर्ण केली आहेत.(कसोटीमध्ये २४ तर एकदिवसीयमध्ये ३६). तर सचिनने ६० शतक पूर्ण करण्यासाठी खेळलेल्या डवांपेक्षा ४० डाव कमी आहेत.
विंडीज विरूद्ध ५ शतक ठोकणारा विराट जगातील तीसरा क्रिकेटर बनला आहे. विराटच्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेचा हर्शल गिब्स आणि हाशिम अमला या दोघांनी ही कामगिरी केली होती. कर्णधार पद म्हणून विराटचे १४ वे एकदिवसीय शतक ठरले आहे.
अधिक वाचा : सायना नेहवाल ची जपानच्या नोझुमी ओकुहारावर मात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola