अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरातील स्थानिक जवाहर नगर परिसरातील समोर असलेल्या चहाविक्रेता व त्याच्या मुलाला दी.१७ ऑक्टो ला सकाळी १० वा अकोल्यातील एका अभ्यासू आमदाराने आपल्या कार्यकर्त्यासह या छोटा कीरकोळ व्यवसाय करणाऱ्या,हातमजूरी करणाऱ्या या पितापुत्राना त्याच्या चहा हॉटेल समोर जाऊन भर चौकात मारहाण केली,व त्यांना शिविगाळ करत सर्व लोकांसमोर लाथाबुक्क्यांनि मारहाण केली.व सर्वांसमोर त्यांचा अपमान केला.तसेच यासंबंधी जेव्हा हे कुटुंबीय पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल करायला निघाले तेव्हा आमदारांनी काही कार्यकर्त्यांना पाठवून त्यांना रोखले व धमक्या दिल्या त्यामध्ये,जर तू रिपोर्ट दिला तर परिणाम वाईट होतील,तुझी व्यवसायाची जागा आम्ही हिसकावून घेऊ,तुझ्या कुटुंबाला आम्ही सोडू नाही,अश्या धमक्या दिल्या.व दबाव आणला.घाबरलेले हे कुटुंब याबाबत कोणतीही तक्रार द्यायला धजावत नाही.तसेच सर्व जण त्या घटनेपासून दहशत मध्ये आहेत.या घटनांमुळे तसेच लोकप्रतिनिधी मुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे.
तरी संबधीत कुटुंबाला याबाबत न्याय मिळेल अशी आशा सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत.आमदाराच जर अशे कारनामे करीत असणार तर सर्व सामान्य व्यक्तीने कसे जगावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आमदाराच्या या प्रतापाची सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
अधिक वाचा : डॉ. मुरहरी केळे लिखित चरित्रग्रंथावर रविवारी परिसंवादाचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola