‘बधाई हो’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत ७.२९ कोटींचा गल्ला जमवला आहे. मध्यमवयीन जोडप्याच्या या प्रेमकहाणीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य प्रदेशमधील सिनेमागृहात प्रदर्शित न होताही चित्रपटाला घवघवीत यश मिळवले आहे. आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. या चित्रपटाचं समीक्षकांनीही तोंडभरून कौतुक केलं आहे.
#BadhaaiHo takes a FLYING START… Gets the advantage of partial holiday… Expected to score over the weekend… Thu ₹ 7.29 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) October 19, 2018
चित्रपटातील २४ वर्षीय नायकाची आई गरोदर असते. ही बातमी कळताच सगळीकडं उलटसुलट चर्चा सुरू होते. नायकाचं कुटुंब या चर्चेचा सामना कसं करतं, त्यातून कसं बाहेर पडतं, हे ‘बधाई हो’ मध्ये दाखवण्यात आलं आहे. साधा, सरळ, विनोदी विषय असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची प्रचंड गर्दी खेचत आहे. दिवसागणिक चित्रपटाची कमाई वाढत असून लवकरच चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा : Bigg Boss12 : बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार अभिनेत्री किम शर्मा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola