मूर्तिजापूर(प्रकाश श्रीवास) : मध्य रेल्वेचे भुसावळ येथील विभागीय व्यवस्थापक ए.के.यादव यांनी आज येथील रेल्वे स्थानकास भेट देऊन विविध यंत्रणांचे निरिक्षण करीत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या व अस्वच्छतेबाबत कानउघाडणी केली. अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरील आरपीएफ पोलीस ठाण्याचे उद्घाटन करून परत जात असतांना त्यांनी या मार्गावरील सर्व लहानमोठ्या स्थानकांचे निरिक्षण केले. माहिती घेतली. सूचना दिल्या. डिसेंबर माहिन्यात रेल्वे महाप्रबंधक श्री. शर्मा यांच्या नियोजित निरीक्षण दौऱ्याची ही पूर्वतयारी असल्याचे समजते. प्रवासी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. मुख्य बुकींग पर्यवेक्षक कार्यालय परिसरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी संबधितांची कानउघाडणी केली. विभागातील सर्व शाखांचे आधिकारी त्यांच्यासमवेत होते.
“या जंक्शन रेल्वे स्थानकावर कोच डिस्प्ले लावण्यात यावा, प्रवासी निवारा वाढवावा, सुपर फास्ट गाड्यांना थांबा द्यावा, ‘शकुंतले’चा वनवास संपवावा आदी मागण्यांचे निवेदन डीआरएम यादव यांना देऊन त्यांच्याशी त्यासंदर्भात पत्रकारांच्या वतीने पत्रकार बबलू यादव यांनी चर्चा केली व सकारात्मक प्रतिसाद मिळविला.”
अधिक वाचा : अज्ञाताने महीलेचे मंगळसूत्र हिसकले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola