हैदराबाद – आयकर विभागानं जोरदार कारवाईला सुरुवात केली असून थेट मंत्री महोदय आणि बडी नावं यामध्ये समोर येत आहेत. आंध्र प्रदेशचे कायदे मंत्री आणि टीडीपीचे आमदार सीएम रमेश यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि व्यावसायिक भागिदारांच्या घरांवर आयकर विभागाने आज सकाळी धाडी टाकल्याचे वृत्त आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली आहे.
सीएम रमेश हे रित्विक प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीच्या भागिदारांच्या घरांवर देखील आयकर विभागाने छापे घातले आहेत. सीएम रमेश हे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे खंदे समर्थक मानले जातात. आता या आयकर धाडीमुळे हैदराबादमध्ये राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : तीन कोटींपेक्षा जास्त प्रलंबित प्रकरण: चीफ जस्टिस गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्ट्या केल्या रद्द
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola