• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यातील ‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण आ. बाजोरियांचा पुढाकार

City Reporter by City Reporter
June 6, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
80 1
0
rto new office akola
12
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान): अकोला उपप्रादेशिक कार्यालयाची (आरटीओ) इमारत जीर्ण झाल्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाNयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता या कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी शिवसेना आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत शुक्रवारी शहरातील काही शासकीय कार्यालयांची पाहणी केली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार व इतर अधिकारी उपस्थित होते. अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतच्या आरटीओ कार्यालयाचे तीन वर्षांपूर्वी स्थानांतरण होऊन रेल्वे स्टेशन चौकातील मनपाच्या शाळेत कार्यान्वित करण्यात आले होते. या इमारतीचे भाडे महापालिका प्रशासनाकडे जमा केले जाते. दरम्यान, इमारतीची रचना पाहता या ठिकाणी कामकाज करणे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अवघड झाले आहे. वाहने ठेवण्यासाठी तोकडी जागा, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतागृहाचा अभाव, जीर्ण झालेली इमारत, ठिकठिकाणी कोसळणारे छत व गळक्या छतामुळे पावसात भिजणारे दस्तऐवज आदी समस्यांचा सामना करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊन परवाना मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचीही कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात मागील वर्षभरापूर्वी आ.गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या.

संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा ही समस्या सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने आ.बाजोरियांनी सदर कार्यालयाची दोन वेळा पाहणी केली. अखेर जीर्ण इमारतीचा धोका लक्षात घेता आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आ.बाजोरिया यांनी शुक्रवारी आरटीओ कार्यालयाची पाहणी करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांच्यासोबत चर्चा केली, तसेच शहरातील इतर कार्यालयांची पाहणी केली. यावेळी शहर प्रमुख तथा मनपा गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

बीएसएनएल’ कार्यालयाची पाहणी
‘आरटीओ’ कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आ.बाजोरिया यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी याच परिसरातील ‘बीएसएनएल’ कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर शहरातील इतरही जागेची पाहणी करण्यात आली. स्लॅब कोसळला; दस्तऐवज वाफ्यावर मनपा शाळेच्या इमारतीत आरटीओ कार्यालय थाटण्यात आले. ही इमारत जुनी असल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दस्तऐवज ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एका खोलीत पोत्यांमध्ये भरून दस्तऐवज ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. जीर्ण झालेले दस्तऐवज रामभरोसे असल्याचे आढळून आले.

Previous Post

अकोल्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द —- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next Post

तेल्हारा येथील प्रथमेश ने रचला क्रीडा मध्ये इतिहास

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तेल्हारा येथील प्रथमेश ने रचला क्रीडा मध्ये इतिहास

तेल्हारा येथील प्रथमेश ने रचला क्रीडा मध्ये इतिहास

पूर्णा मायच्या स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई; स्वयंस्फूर्तीने राबविले स्वच्छपूर्णा अभियान

पूर्णा मायच्या स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई; स्वयंस्फूर्तीने राबविले स्वच्छपूर्णा अभियान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.