नवी दिल्ली – आज ३ ऑक्टोबरपासून भारताचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई पदभार स्वीकारणार आहेत. मंगळवारी दीपक मिश्रा हे सरन्यायाधीशपदावरुन पायउतार झाले. १३ महिने १५ दिवसांचा कार्यकाळ गोगोई यांच्याकडे असणार आहे. आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी उपक्रमाचे निरिक्षण न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन यांच्यासह गोगोई हे करत आहेत.
गोगोई आपल्या ‘नो-नॉन्सेस’ अॅप्रोचसाठी प्रसिध्द आहेत. गोगोई यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला असून १९७८ साली त्यांची अधिकृत वकील म्हणून नोंदणी झाली. गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून २३ एप्रिल २०१२ रोजी रुजू झाले. गुवाहाटी उच्च न्यायालयात त्यांनी संवैधानिक, कर आणि कंपनीसंबंधी बाबींवर अभ्यास केला. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांची ९ सप्टेंबर २०१० रोजी बदली झाली. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून १२ फेब्रुवारी २०११ ला नियुक्ती झाली.
अधिक वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी ला ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कारने सन्मानित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola