• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑनलाईन वाटप ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या स्वस्तधान्य दुकानावर कार्रवाई

City Reporter by City Reporter
June 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
ऑनलाईन वाटप ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या स्वस्तधान्य दुकानावर कार्रवाई
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला(शब्बीर खान)- धान्याचे वाटप पॉस मशीनद्वारे आॅनलाइन ऐवजी मॅन्युअली करून धान्याचा काळाबाजार केला जात आहे. त्यामुळे ज्या दुकानांमधून आॅनलाइन वाटपाचा व्यवहार ५० टक्क्यांपेक्षा कमी होत आहेत, त्या दुकानांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव तहसीलदारांनी तातडीने सादर करण्याचा आदेश अकोला जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, संबंधित दुकानदारांवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गतही कारवाई केली जाणार आहे. धान्य न घेणाऱ्या लाभार्थींच्या नावे शासनाकडून उचल केली जाते; मात्र लाभार्थींना वाटप होत नाही. त्यातून होणारा धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ‘एई-पीडीएस’प्रणाली सुरू केली; मात्र पॉस मशीनद्वारे वाटप करण्यासाठी माहिती न जुळणे, लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक नसणे, यामुळे ग्रामीण भागात ७० ते ८० तर शहरी भागात ६० ते ७० टक्केच वाटप एई-पीडीएस प्रणालीतून होत आहे. उर्वरित लाभार्थींना मॅन्युअली वाटप होत आहे. मॅन्युअली वाटप होत असलेले धान्य पात्र लाभार्थींनाच दिले जाते की नाही, त्यांच्या नावे भलत्याच व्यक्तींची नावे दाखवून त्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकारही घडत आहे. त्यामुळे शासनानेच मॅन्युअली धान्य वाटपाची चौकशी करण्याचे आधीच बजावले. त्यासाठी जुलै २०१८ मध्ये मॅन्युअली वाटपासाठी ठरलेल्या नॉमिनींची प्रथम बायोमेट्रिक पडताळणीही सुरू करण्यात आली. त्यामध्ये मार्च २०१८ पासून ही तपासणी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे म्हटले.त्या अहवालानुसार दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. आॅनलाइनला फाटा देत वाटप सुरू विशेष म्हणजे, शासनानेच लाभार्थ्यांना होणारे मॅन्युअल वाटप पूर्णत: बंद करण्याचा आदेश दिला आहे; मात्र तरीही शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हा प्रकार सुरू आहे. मॅन्युअल धान्य वाटपाची घरोघर जाऊन तपासणी करावी, त्याचा अहवाल पुरवठा अधिकारी कार्यालयात सादर करावा, यासाठी बैठकीमध्ये सातत्याने लेखी, तोंडी सूचना दिल्यानंतरही पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे मार्च २०१८ पासून दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना केलेल्या आॅनलाइन धान्य वाटपाच्या अहवालात ५० टक्क्यांपेक्षा कमी ट्रांजक्शन असलेल्या दुकानांचे परवाने निलंबित केले जाणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे पुरवठा अधिकारी देशपांडे यांनी बजावले.

Previous Post

खेळामुळे मिळणाऱ्या प्रसिध्दीचा वापर सामाजिक योजनांच्या यशस्वितेसाठी करावा – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

Next Post

अडगाव बु येथे शांतता समितीची सभा संपन्न

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अडगाव बु येथे शांतता समितीची सभा संपन्न

अडगाव बु येथे शांतता समितीची सभा संपन्न

अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध-डॉ रणजित पाटील

अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध-डॉ रणजित पाटील

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.