दानापूर (सुनीलकुमार धुरडे)- दानापूर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आज एक सप्टेंबर ते तिस सप्टेंबर या कालावधीत चालु असलेल्या पोषण अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडीत करण्यात आले होते. यामध्ये किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण तथा मेळावा घेण्यात आला .त्याच बरोबर महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत .यामध्ये पोषण आहार प्रदर्शनी , हरतालिका ,गणपती स्थापना , लाडू ,गुळपटटी वाटप ,दुध वाटप , त्याच बरोबर सुदृढ बालक स्पर्धा , फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमामध्ये दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅ. अग्रवाल मॅडम ,अंगणवाडी च्या सौ. सुनिता पाटिल , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवलकार मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या किशोरीना योग्य ते मार्गदर्शन करित समस्यांचे निराकरण कसे करावे या वर मार्गदर्शन केले .त्याच बरोबर खचून न जाता हिमतीने काम करा असे ही सांगितले .या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत डाॅ. अग्रवाल मॅडम ह्या होत्या , यावेळी अंगणवाडी सेविका , किशोरी, मदतनीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताडे मॅडम , तर आभार प्रदर्शन मिना दामधर यांनी केले .
अधिक वाचा : खापरखेड येथील सतरा वर्षीय युवकाने घेतला गळफास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola