• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

खाजगी रूग्णालयाकडून रूग्णाची लुट; पत्रकार परिषदेत समाजसेवक बबलु भेलोंडे यांचा आरोप

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
मूर्तीजापुर
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तीजापुर (प्रकाश श्रीवास)- केंद्र आणि राज्य शासनाने गरीबांना अत्यल्प दरामध्ये औषधोपचार व विविध रूग्णांच्या दृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिली असतांना मात्र खाजगी रूग्णालयाकडून रूग्णांच्या नातेवाईकांच्या मनात भावनिक दृष्टीने भिती घालून आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत समाजसेवक बबलु भेलोंडे यांनी केला आहे. मूर्तीजापुर शहरातील न्यु.डि.पी.रोड हरीया नगर मेन रोडवर बालरोग तज्ञ व नवजात शिशू तज्ञ डॉ. विनायक धुर्जड यांचे माऊली बाल रूग्णालय आहे.

या रूग्णालयातुन गरीब रूग्णाची अक्षरशा आर्थिक लुट रूग्णालयांच्या संचालकाकडुन होत आहे. याविषयी पत्रकार परिषदेत समाजसेवक बबलु भेलोंडे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की माऊली बाल रूग्णालयामध्ये दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी परी केळस्कर वय पाच महीने हिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. या रूग्णालयात भरती केल्यानंतर रूग्णाला आवश्यक असलेली प्राथमिक सुविधा उपलब्ध करून न देता संपूर्ण औषधी बाहेरील मेडिकल मधुन बोलावली आणि रूग्णाला डिस्चार्ज करतांना प्रति दिवस १०५०/- याप्रमाणे शूल्क आकारण्यात आला.रूग्णाला केवळ हाँस्पीटल मध्ये ठेवण्यात आले. दोन दिवसाच्या कालावधी मध्ये डॉ. विनायक धुर्जड यांनी एकही दिवस येवून रुग्णांला पाहीले नाही. प्रत्येक दिवशी लिहून दिलेले औषधे बाहेरून आणावयास लावले.सदर रूगणांवर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार रूग्णालयाकडून करण्यात आले नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सर्वसामान्य रूममध्ये रूग्णाला ठेवून त्यावर पाचशे रुपये प्रति दिवस याप्रमाणे सतत तिन दिवसाचे १५००/- रुपये, डॉक्टर व्हिजीट फी २००/- याप्रमाणे ६००/- रूपये, नर्सिंग चार्जेस२००/- याप्रमाणे ६००/- रूपये व सलाईन लावण्याचे १५०/- असे ४५०/- असा एकुण खर्च ३०५०/- रूपये रूग्णांकडुन आकारण्यात आला.याविषयी रूग्णांकडुन हाँस्पीटल चे पकके बिल मागीतले असता टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. फार त्रास देवुन तब्बल दोन तासांनी बिल देण्यात आले. बिल पाहिले असता शासनाच्या डोळयात ही धुळ फेक केल्याचे निदर्शनास आले आहे. डॉ. धुर्जड हे मूर्तीजापुर येथे मागील सात ते आठ वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. या कालावधीत त्यांनी कितीतरी या रूगण भरती होवून गेले. प्रत्येक रुग्णांस दिलेले बिल हे एकाच क्रमांकाचे म्हणजेच ३२७/- असे असल्याचे दिसून आले. याचा अर्थ आतापर्यंत रूग्णाकडून वसूल केलेली रक्कम ही शासनापासुन लपवून ठेवली. त्याचा कोणत्याही प्रकारचा इन्कमटँकस भरल्या गेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.एकीकडे रूग्णाच्या नातेवाईकांच्या आर्थिक लुट करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या डॉ. धुर्जड यांच्या वर योग्य कारवाई करून खाजगी रूग्णालयाला आवश्यक असलेले सर्व नियमांचे पालन होते किंवा नाही.

याबाबत त्वरित चौकशी करून रूग्णांची होणारी आर्थिक लुट थांबवावी व शासनाच्या तिजोरीत जाणारा पैसा ही या डॉक्टर कडून वसूल करण्यात यावा.याविषयी१५ दिवसात कार्यवाही न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल आणि त्याकरिता शासन जवाबदार राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत समाजसेवक बबलु भेलोंडे यांनी माहिती देताना सांगितले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत आनंद देवीदास बांगड, ओम चांडक, राहुल रवींद्र साबु,सागर अग्रवाल, नितीन टाले यांची उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री म.रा.मुंबई, आरोग्यमंत्री मुंबई, पालकमंत्री अकोला, जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी मूर्तीजापुर, उपसंचालक आरोग्य विभाग अकोला, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रूग्णालय अकोला, वैद्यकीय अधिकारी लदेसा रूग्णालय मूर्तीजापुर.यानांही देण्यात येवून कार्यवाहीची मागणी करण्यात आली.

अधिक वाचा : सर्पमित्रांनी दिले दहा फुटाचे अजगराला जिवनदान

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

व्हिडिओ: हिवरखेड येथे आगळी वेगळी गणपती स्थापना

Next Post

” गण गण गणात बोते ” मंत्रघोषाने संत नगरी दुमदुमली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेगाव

" गण गण गणात बोते " मंत्रघोषाने संत नगरी दुमदुमली

प्रकाश जावडेकर

सम्यक विध्यार्थी आंदोलन अकोला च्या वतीने प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.