पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशहिताच्या नसलेल्या अनेक गोष्टी केल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल तसेच घरगुती गॅसच्या दरांमध्ये होत असलेल्या विक्रमी वाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोध पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. रामलीला मैदानावर पोहोचण्याअगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले.
दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर काँग्रेससह १६ विरोधी पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवत हे सरकार बदलण्याची वेळ आल्याचे नमूद केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. इंधन दरवाढीवरून मोदी गप्प का आहेत, अशी विचारणा राहुल यांनी यावेळी केली. मोदी फक्त भाषणे देतात पण काम काहीच करत नाहीत असा टोलाही लगावला.
अधिक वाचा : भारत बंद : राहुल गांधींकडून ‘कैलास’चे पवित्र जल राजघाटावर अर्पण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola