गांधीग्राम(प्रतिनिधी)- अकोला जिल्यातील गांधीग्राम येथील एका २३ वर्षीय युवकाचा मशिनिने पाणी भरण्याच्या गडबडीत शॉक लागल्याने मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी घडली.
गांधीग्राम येथे दर १५ दिवसांनी पाण्याचा पुरवठा होतो, त्यामध्येही नळाला पाणी येत नाही.अशात गांधीग्राम वासी पाण्याची मोटार लावून पाणी भरतात. आज सकाळी गावातील शुभम रवींद्र सदांशीव(२३) हा अशाच प्रकारे मोटारीने पाणी भरण्याच्या गडबडीत होता. मोटारीची पिन लावत असताना अचानक त्याला त्या पीनेच्या माध्यमातून शॉक लागला. शॉक एवढा जबर लागला की अकोला येथे उपचारासाठी नेत असतांना उगवा फाट्याजवळ त्याचा मृत्यू झाला. शुभमची आई ही जावयाचा अपघात झाल्याने मुलीच्या दुःखात मुलीच्या घरी गेलेली होती तर वडील मोलमजुरी साठी बाहेर मोठा भाऊ एका खाजगी गाडीवर ड्रायव्हर असल्याने तो बाहेर बहीण कॉलेज मध्ये अशात शुभम हा घरचे पाणी भरत असताना सदर शॉक लागला. शुभम हा हुशार होता बारावी पर्यंत शिक्षण करून पुढे त्याने आयटीआय केला. मनमिळाऊ व होतकरू असा होता त्याच्या अशा मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक वाचा :पातुर येथील अपघातात मृत्यु झालेल्या शिवभक्तांच्या घरी अंजलीताई आंबेडकर यांची सांत्वन भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola