• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यात चोरांनी क्रेडिट कार्ड नंबर हॅक करून परस्पर काढले सात लाख; सतर्क राहण्याची गरज

City Reporter by City Reporter
June 9, 2020
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
cyber crime
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- अमेरिकन एक्स्प्रेस शाखा प्रभादेवी मुंबईच्या काही क्रेडीट कार्ड ची माहिती शहरातील चौघांनी चोरली. त्यांनी संबंधित खातेदारांच्या क्रेडिट कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबरमध्ये बदल केला. त्यानंतर अकोल्यात पेटीएमद्वारे ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची परस्पर खरेदी केल्याची धक्कादायक बाब बँकेच्या सायबर शाखेच्या तपासामध्ये उघड झाली आहे. दरम्यान या प्रकरणी चार ठकसेनांविरुद्ध येथील डाबकी रोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये मंगळवारी ४ सप्टेंबरला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जून २०१८ ते ३ जुलै २०१८ या कालावधीत या बँकेतील काही खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात आल्याच्या तक्रारी बँकेकडे येत होत्या. दरम्यान या संदर्भात बँकेच्या कित्येक खातेदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बँकेच्या सायबर तज्ज्ञांनी तपास केला असता बँकेच्या काही खातेदारांच्या पश्चात त्यांचे मोबाइल नंबर बदलण्यात आल्याचे तपासणीत समोर आले. त्यानंतर तज्ज्ञांनी बदलण्यात आलेल्या मोबाइल नंबरचा डाटा मिळवला असता अकोला येथील प्रतीक सुभाषराव कराळे(रा. कोर्ट कॉलनी, आश्रयनगर डाबकी रोड), विक्की गव्हाळे(रा. रेणुकानगर डाबकी रोड), अर्पित यादव (रा. गजानन मंदिर जवळ कॅनॉल रोड, पार्वतीनगर) व तुळशीदास मारोती साबळे (रा. सरस्वती नगर डाबकी रोड) या चौघांची नावे समोर आली. या चौघांनी खातेदारांचे मुळ नंबर बदलून त्यांचे मोबाइल नंबर रजिस्टर करून घेतले होते. त्यानंतर त्यांनी पेटीएमच्या माध्यमातून पेंमेट करून लॅपटॉप, मोबाइल, मोटार सायकली खरेदी केल्या, अशी तक्रार अमेरिकन एक्स्प्रेस प्रभादेवी मुंबई शाखेचे सिक्युरिटी अधिकारी मिलिंद रामचंद्र चव्हाण यांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध भादंवि ३७९, ४२०, ३४ सहकलम ४३, ६६ ब,क,ड,ई, माहिती व तंत्रज्ञान कायदा नुसार गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अशी झाली बँकेच्या खातेदारांची फसवणूक 
> इक्बालसिंग सौन्ध रा. दिल्ली यांचा क्रेडिट कार्डचा मोबाइल बदलून अर्पित यादव याच्या नावाने मोबाइल व इतर वस्तूंची खरेदी (दोन लाख १९ हजार ६९७ रुपयांची) सौन्ध यांच्या खात्यातून २४ जून रोजी केली.
> गौतम खन्ना अप्पासाहेब सोसायटी मराठे मार्ग प्रभादेवी मुंबई यांच्या खात्याला रजिस्टर असलेला मोबाइल नंबर बदलून प्रतीक सुभाषराव काळे याने २७ जून रोजी एक लाख १९ हजार ४३८ रुपये पेटीएमद्वारे ऑनलाइन यामाहा कंपनीची मोटारसायकल रतनलाल प्लॉटमधून खरेदी केली.
> निलंजना मुखोपाध्याय रा. बंगळुरू यांचा मोबाइल क्रमांक जो क्रेडिट कार्ड खात्याला रजिस्टर केलेला आहे. तो मोबाइल क्रमांक बदलून त्याऐवजी दुसरे नंबर रजिस्टर केले व पेटीएमद्वारे मोबाइल व लॅपटॉप हे तुळशीदास मारोती साबळे याच्या नावे दोन लाख दोन हजार ८३८ रुपयांची २७ जून रोजी खरेदी केले.
> अंशुमन बापना रा. बंगळुरू यांच्या खात्याला रजिस्टर असलेला नंबरसुद्धा बदलण्यात आला. त्यांच्या खात्यातून दोन लाख २४ हजार ५०१ रुपये पेटीएमद्वारे मे. राज मोटर्स अर्बन डिव्हिजन अमरावती यांच्या खात्यात वर्ग करण्यात येऊन तेथून मोटार सायकल खरेदी केली.

आरोपींनी अकोल्यात केली खरेदी 
आरोपींनी आधी खातेदारांचे क्रेडिट कार्ड नंबर हॅक केला. त्यानंतर ऑनलाइन मोबाइल नंबर बदलवला व आलेल्या ओटीपी(वन टाइम पासवर्ड)च्या माध्यमातून पेटीमद्वारे खातेदारांच्या क्रेडिट कार्डमधून अकोला शहरात व अमरावती शहरात वस्तूंची खरेदी केली.

खातेदारांनी सतर्कता बाळगावी 
अनेकदा खातेदारांचे अनेक बँकांमध्ये खाते असल्यामुळे ते या खात्यांविषयी माहितीच घेत नाही, असे खाते हॅकरच्या रडारवर असतात. त्याचप्रमाणे शनिवारी, रविवारी किंवा सुटीच्या आदल्या दिवशी कोणीतरी फोन करतो आणि क्रेडिट कार्डचा नंबर मागतो. त्यानंतर आलेला ओटीपी मागितला जातो त्यामुळे फसवणूक होते. याशिवाय दोन-तीन दिवस बँका बंद राहणार या धास्तीने खातेदार अशा गोष्टीला बळी पडतो. त्यामुळे बँकेविषयीची माहिती फोनवरून कुणालाही सांगू नये. – सीमा दातारकर, प्रभारी अधिकारी सायबर पोलिस ठाणे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsCreadit CardHackers
Previous Post

अकोट ग्रामिण डी.बी. पथकाची पानमसाला गुटख्यावर मोठी कारवाई,सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

‘वावर’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

‘वावर’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने मुंग खरेदीस प्रारंभ

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने मुंग खरेदीस प्रारंभ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.