• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

वान नदीत १५ वर्षांत ५२ बळी

Team OurAkola by Team OurAkola
June 9, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
वान नदीत १५ वर्षांत ५२ बळी
12
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यच्या सीमेवरील दगडी बांधणीचा शिवकालीन मठ हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. येथून वाहणाऱ्या वान नदीत बुडून १५ वर्षांत ५२ जणांचा बळी गेल्याची माहिती वान फाऊंडेशनला माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. मात्र, सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात प्रशासनातील विविध विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने या पर्यटनस्थळी आणखी किती बळी जाणार, याबाबत भीती व्यक्त केली जात आहे.

सातपुडा पर्वत आणि वान अभयारण्याच्या पायथ्याशी व वान नदीच्या किनाऱ्यावर दगडी बांधणीचा शिवकालीन मठ आहे. अकोला, अमरावती व बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यच्या सीमा त्याठिकाणी एकत्र येतात. अभयारण्य, पर्वत आणि नदी यामुळे मठाच्या सभोवताली सुंदर निसर्गसौंदर्य असल्याने पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. याशिवाय वर्षांतून पाच ते सहा उत्सव याठिकाणी होतात. मात्र, या पर्यटनस्थळाची सुरक्षा व्यवस्था शून्य आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

येथील निसर्गसौंदर्य पाहून पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. वान नदीतील मामा-भाचा डोहात मृत्यूची भयकथा भयंकर आहे. या डोहाला अनेक दगडी कपारी आहेत आणि एकदा पर्यटक याठिकाणी अडकला तर थेट मृतदेह हाती लागतो, असाच अनुभव आहे. अलीकडच्या दोन महिन्यात याठिकाणी चार जणांचा बळी गेला. वर्षांतून किमान दहा बळी जातात.

पालकमंत्र्यांच्या आदेशालाही हरताळ

या पर्यटनस्थळाला सुरक्षा व्यवस्था हवी म्हणून गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी काम करणाऱ्या वान फाऊंडेशनने सातत्याने लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला साकडे घातले. गेल्यावर्षी गृहराज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष पर्यटनस्थळावर नेले. त्यांनी याठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले. मात्र, तब्बल एक वर्ष होऊनही सुरक्षा व्यवस्थेचे कोणतेही काम याठिकाणी झाले नाही. पालकमंत्र्यांनी यासंदर्भात समिती स्थापन करण्यास सांगितले होते. ही समिती देखील स्थापन झाली नाही. वन, महसूल आणि पाटबंधारे खाते एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे.

प्रक्रिया अतिशय संथ गतीने

गेल्या आठवडय़ात आम्ही केलेल्या तक्रारीनंतर अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता याठिकाणी येऊन गेले. तसेच विशाखापट्टणमचा एक चमू याठिकाणी पाहणीसाठी आला. मात्र, ही सर्व प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे. माहिती अधिकारात २५ वर्षांतील मृत्यूंच्या संख्येबाबतची माहिती मागितली तर १५ वर्षांचीच देण्यात आली. स्थानिकांच्या माहितीनुसार २५ वर्षांत तब्बल १७० पर्यटकांचे बळी याठिकाणी गेले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासन आणखी बळींची वाट तर पाहात नाही ना, अशी शंका वान फाऊंडेशनचे उत्तम नळकांडे यांनी व्यक्त केली आहे.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

भारिप जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप वानखडे यांची वर्णी

Next Post

अकोट ग्रामिण डी.बी. पथकाची पानमसाला गुटख्यावर मोठी कारवाई,सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोट ग्रामिण डी.बी. पथकाची पानमसाला गुटख्यावर मोठी कारवाई,सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

अकोट ग्रामिण डी.बी. पथकाची पानमसाला गुटख्यावर मोठी कारवाई,सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

cyber crime

अकोल्यात चोरांनी क्रेडिट कार्ड नंबर हॅक करून परस्पर काढले सात लाख; सतर्क राहण्याची गरज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.