भांबेरी (योगेश नायकवाडे) :- येथे प्र.क्र.४ व ५ मध्ये बऱ्याच वर्षापासून रस्ते झालेले नाहीत त्यासाठी प्रभाग क्र.४ व ५ मधील ग्रामस्थानी ३१ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना निवेदन दिले होते, त्यानुसार ३ सप्टेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालय भांबेरी समोर आमरण उपोषणासाठी प्र.क्र.४ व ५ मधील ग्रामस्थ बसलेले होते.आज उपोषणाचा दुसरा दिवस असताना उपोषण कर्त्यांना भेट देण्यासाठी व उपोषणातील मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी जि.प.सर्कल भांबेरीचे सदस्य सौ.शबानाखातून सैफुल्ला खां तसेच पंचायत समितीचे उपसभापती सचिनभाऊ झापर्डे, ग्रा.पं.भांबेरीचे सचिव एम.एच.चव्हाण, सरपंच मिलिंदभाऊ भोजने, उपसरपंच सागरभाऊ कौसल हे उपस्थित झाले होते. सौ.शबानाखातून सैफुल्ला खां ह्यांनी दलित वस्तीसाठी २२ लाख ७१ हजार निधी या अगोदर दिलेला आहे.आणि आज असे आश्वासन दिले की,अजूनही दलित वस्तीसाठी निधी देऊन रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात केली जाईल. तसेच सरपंच ह्यांनी आश्वासन दिले की,जसा निधी जमा होईल तसेच आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली जाईल.उपोषणाला बसलेल्या सर्वांनी एकमतानी निर्णय घेऊन उपोषणाला स्थगिती दिली,त्यावेळेस गावातील बरेच नागरिक उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola