अकोला(प्रतिनिधी)- आज २ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पासुन पुर्णानदी पात्रात गांधीग्राम येथे शेवटच्या श्रावण सोमवारला राजेश्वराला येथुन जलभिषेक नेण्यासाठी अकोला येथुन तसेच जिल्हा भरातुन मोठया प्रमाणात कावडधारी शिवभक्त तसेच भाविक भक्त या ठिकाणी येतात. आज पुर्ण रात्रभर येथे यात्रेचे स्वरूप निर्माण होते. या करिता पाण्यात डुबण्याच्या कींवा पुलावर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांच्या सेवेसाठी व रक्षणासाठी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सज्ज असणार आहे. माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
यामध्ये रेस्क्यू वाहनासह रेस्क्यू साहित्य प्रथमोपचार कीट.सह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात सुरज ठाकुर, गोकुल तायडे, ऋषीकेश राखोंडे, गोपाल कुसदकर, उमेश बील्लेवार, प्रशांत सनगाळे, तुळशीदास फुकट, गोविंदा ढोके, मनिष बुटे, पंकज श्रीनाथ, पवन सनगाळे, सचिन बंड, राहुल जवके, हे सज्ज झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब, दहीहांडा पोलीस ठाण्याचे पि.आय प्रदीप देशमुख साहेब. आणी कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम सहभागी झाली आहे. यामध्ये सुनिल कल्ले साहेब, हरीहर निमकंडे साहेब, प्रशांत सायरे साहेब, दीपक सदाफळे, प्रेमकुमार दामोदर, देवेंद्र तेलकर, अतुल वानखडे, सचिन चिकार, आणी मुंडगाव येथील आपत्कालीन पथक, तसेच आगर येथील आपत्कालीन पथक, असणार आहे.
आपत्तीच्या मदतीसाठी 9822229471 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन दीपक सदाफळे यांनी केले.
अधिक वाचा : कावड उत्संव निमित्य अकोट ग्रामीण व शहर पोलिसांचा तगडा बदोंबस्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola