बाळापुर : आ. बळीराम सिरस्कार यांच्या विशेष विकास निधीअंतर्गत मंजूर झालेल्या बाळापुर तालुक्यालीत विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी पं.सं. सभापती मंगला तितूर, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष गजानन लांडे, महासचिव सुभाष तायडे यांच्यासह पं. सं. उपसभापती तथा सर्व सन्माननीय सदस्य व भारिप बहुजन महासंघाचे आजी- माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार ३१ ऑगस्ट रोजी ९.३० वाजता पारस, १० वाजता मांडोली,१०.३० वाजता कोळासा, १२ वाजता मनारखेड, २ वाजता कळबी खुर्द् , ३ वाजता लोहारा येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी वरील कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच, उपसरपंच तथा ग्रामस्थ पारस, कोळासा, मांडोली, मनारखेड, कळबी खुर्द्, लोहारा यांनी केले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola