अकोला दि 30 : शेतकऱ्यांच्या समस्या व वेगळ्या विदर्भाला सरकार न्याय देऊ शकत नाही म्हणून विधार्भातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी व तालुक्यात 2 आक्टोबर गांधी जयंती च्या दिवशी दिवसभर आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार ऍड वामनराव चटप यांनी दिली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने आज आयोजित केलेल्या स्थानिक विश्रामगृहावर कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते ललित बाहाळे, मनोज तायडे, सतीश देशमुख, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, रंजना ममर्डे,सविता वाघ, टीना देशमुख, सुरेश जोगळे, लक्ष्मीकांत कौठकर, डॉ के ए शर्मा, विनोद देशमुख, ठाकुरदास चौधरी, दर्पण खंडेलवाल, डॉ मनीष खंडारे, युनूस भाई उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार वामनराव चटप यांनी विस्ताराने आपल्या भाषणातून माहिती दिली, सरकारच्या नाकर्तेपणावर ठपका ठेवत त्यांनी लोकांच्यामध्ये प्रचंड असंतोष धुमसत असल्याचे सांगितले.
अधिक वाचा : अकोट ग्रामिण पो.स्टेशनचे ए.एस.आय.विरुद्ध अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कडे तक्रार!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola