भांबेरी(योगेश नायकवाडे): भांबेरी येथे दि.29/08/2018 रोजी ग्रामपंचायत कार्यालय भांबेरी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून शुद्धोधन बोदडे ह्यांची निवड करण्यात आली, स्वातंत्रदिनी ग्रामसभा न झाल्याने तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड पुढे ढकलण्यात आली होती गेल्या पंधरा दिवसापासून नागरिकांमध्ये अध्यक्षपदी कोणाची निवड होणार यांची उत्सुकता लागलेली होती कारण भांबेरी गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्षांची निवड गावातील लोकांचे मतदान करून केली जाते आणि या पदासाठी उमेदवार आपले अर्ज ग्राम सचिवांकडे जमा करतात.
त्याप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ग्राम सचिवा कडे दोन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते.त्यामधील एक अर्ज भारत भिमराव बोदडे आणि दुसरा अर्ज वैभव बबनराव देशमुख ह्यांचा अर्ज आलेला होता.त्यानुसार गावातील 141 नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.त्यापैकी भारत बोदडे ह्यांना 109 मते तर वैभव देशमुख ह्यांना 32 मते मिळाली.त्या नियमाने भारत बोदडे 109 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.त्यावेळेस उपस्थित नागरिकांमध्ये ग्रामसभेचे अध्यक्ष शुद्धोधन बोदडे तसेच शासकीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एम एच चव्हाण, ग्रामपंचायत सरपंच मिलिंदभाऊ भोजने,उपसरपंच सागरभाऊ कौसल हे उपस्थित होते.ह्यांच्या मार्फत भांबेरी तंटामुक्ती अध्यक्षपदी भारत भिमराव बोदडे ह्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.तसेच भारत बोदडे ह्यांनी सर्व उपस्थित गावकऱ्यांचे आभार मानले.
हेही वाचा: अकोला जिल्हा भारीप बमस महीला आघाडीच्या वतिने तेल्हारा येथे बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola