• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला जिल्ह्यामध्ये वीजचोरांविरुद्ध महावितरणची मोहीम सहा दिवसांमध्ये ३९६ जणावर कारवाई

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
महावितरण
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०१८  दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहर,अकोट व अकोला ग्रामीण या तिनही विभागामध्ये  भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार ३७२ जणांवर तर कलम १२६ नुसार २४ ग्राहकांवर  अशा एकूण ३९६ जणांवर कारवाई करण्यात आली. जवळपास ३३ लाख ८० हजाराची चोरी झाल्याचे निदर्शनास आले, यामध्ये ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्य अभियंता  डॉ. मुरहरी केळे यांच्या निर्देशानुसार  अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वाखाली  कार्यकारी अभियंते  प्रशांत दाणी (अकोला शहर), प्रमोद काकडे(अकोट) तसेच गजेंद्र गडेकर (अकोला ग्रामीण) या विभागामध्ये विविध पथकामध्ये १६३ अभियंते,अधिकारी कर्मचारी व जनमित्र यांनी  या मोहिमेत  सहभाग घेतला..

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागातील ६७, अकोट विभागातील ८३, तर अकोला ग्रामीण विभागातील २२२  अशा एकून ३७२  जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली, यातील  ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्या अकोला शहर विभागातील ०४, अकोट विभागातील ०१, तर अकोला ग्रामीण विभागातील १९ अशा एकून २४  जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली.

संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  यापूर्वीसुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २६२ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

हेही वाचा : गोवर रुबेला लसीकरण मोहिम काटेकोरपणे राबवावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे निर्देश

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akola districtakola newsMahavitaran
Previous Post

गोवर रुबेला लसीकरण मोहिम काटेकोरपणे राबवावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे निर्देश

Next Post

तिसऱ्या दिवशी सापडला पूर्णेच्या पुरात वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह; जागेवरच केले अंत्यसंस्कार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
तिसऱ्या दिवशी सापडला पूर्णेच्या पुरात वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह; जागेवरच केले अंत्यसंस्कार

तिसऱ्या दिवशी सापडला पूर्णेच्या पुरात वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह; जागेवरच केले अंत्यसंस्कार

गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या सभेतच झाला तंटा,दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या सभेतच झाला तंटा,दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.