अडगाव बु(गणेश बुटे)– येथे पहिला श्रावण सोमवार निमित्त कावळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महासिद्धेश्वर मित्र मंडळ, बजरंग दल मित्र मंडळ, इत्यादी मंडळांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
सदर कावड़ यात्रा जय भोले भोजनालय येथून गोपल भाऊ बोदोडे यांनी पुजन करून सुरु झाली संपूर्ण गावात वाजत गाजत उत्साहपूर्ण वातावरणात द्वारकेश्वर संस्थान येथे कावड़ जलाने महादेवाला अभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात आला शेकडो शिवभक्त व कावड़धारी युवक उपस्थित होते. संपूर्ण गावतुन हजारो लोकांच्या साक्षीनेे कावड़ यात्रा संपन्न झाली.
पावसाची हजेरी
श्रावण मास, शिव कावड़ यात्रा, आणि पावसाचा अटूट संबंध मानला जातो. अडगाव परिसरात पाऊस अनेक दिवसांपासून रुसुन बसलेला आहे पन कावड़ यात्रेनिमित्त थोड्या प्रमाणात का होईना पन पावसाने हजेरी लावून भक्तांना आनंदाची अनुभूती दिली.
हेही वाचा : धोबी समाज आरक्षणासाठी करणार ठिय्या आंदोलन ,अनिल शिंदे व समाजाची पत्रकार परिषदेत माहिती