अकोला:- अकोला जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना यांनी विविध मागण्या संदर्भातील निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद अकोला यांना दि.06/08/2018 ला दिले होते. व संगणक परीचालकांच्या मागण्या व माणधनाचा विषय मार्गी न लागल्यास आमरण उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदनाद्वारे कळविले होते.त्या अनुषंगाने आज दि.13/08/2018 रोजी अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक जि. प.अकोला येथे आमरण उपोषणास बसले असून,जो पर्यंत संगणक परीचालकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असे अकोला जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश मातळे यांनी सांगितले.
संगणक परीचालकाचे माहे. डिसें.2017 ते जून 2018 पर्यंतचे मानधन थकीत झाले असल्याने संगणक परीचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.तसेच याबाबद सांबांधित वरिष्ठ अधिकारी यांना विचारणा केली असता संगणक परीचालकांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या व उद्धट पणाची वागणूक भेटते अश्या अधिकाऱ्यांवर कारवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. संबधित CSC प्रोजेक्ट सुरू होऊन दिड ते दोन वर्षे झाले तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती ऑपरेटर ला नियुक्ती मिळाली नाही. त्यांना त्वरित नियुक्ती मिळावी तसेच जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र वाढविण्यात यावे. अनेक ग्रामपंचायत चे संगणक हे नादुरुस्त स्थितीत आहे. वेळोवेळी कॉम्प्युटरच्या स्टेशनरी व स्पेअर पार्ट ची मागणी करूनही कंपनी कडून स्पेअर पार्टचा पुरवठा केलेला नाही. तरी स्पेअर पार्ट चा पुरवठा त्वरित करून संगणक परीचालकास कॉम्पुटरची व्यवस्था करून द्यावी. अश्या विविध मागण्या करीता अकोला जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे ,संगणक परिचालक आमरण उपोषणास बसले आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola