अकोला: स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्यांवर त्याचेच पूर्वीचे मित्र व मित्रांनी आर्थिक फसवणूक करून कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणाचा तपास करणारे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरासिंग आडे यांनी आत्मदहन करण्याची पाळी आणली असल्या प्रकरणाने थेट राष्ट्रीय मांनवाधिकार आयोग दिल्ली,पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्र चे मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहचल्या नंतर परत जिल्हाधिकारी यांचेकडे आले होते परंतु जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी मात्र अद्यापही संबंधित लोकांवर कारवाई न केल्याने तसेच
गोपाल अग्रवाल कुटुंब यांना अकोल्यात न्याय न मिळाल्याने अखेर आज ते कुटुंब लाल किल्यावर आत्मदहन करण्यासाठी रवाना झाले आहे
स्थानिक मध्यवर्ती बस स्थानकासमोर शहरातील विविध प्रकाशित वृत्तपत्रे विक्री करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे याला जोड म्हणून त्यांनी मागील वर्षी स्थानीक मित्रांसोबत ठेक्याने भाड्याची शेती केली होती त्यामध्ये आलेले तुरीचे पीक मित्रांनी परस्पर विक्री केली त्या द्वारे आलेली रक्कम नियमानुसार गोपाल अग्रवाल याला न देता हडप केली ती रक्कम मागणी केली असता पूर्वीच्या मित्रांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने घरी येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली त्यावर जुने शहर पोलीस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक हिरासिंग आडे यांनी थातुरमातुर चौकशी करीत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले या प्रकरणी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी यांचे तक्रार दिली परंतु चौकशी झाली नाही म्हणून राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ रणजित पाटील यांच्या जनता दरबारात न्याय मागितला मात्र न्याय मिळाला नाही म्हणून राष्ट्रीय मानवा धिकार आयोग यांच्या मार्फत न्याय मागण्याचा प्रयत्न केला आयोगाने पोलीस महासंचालक यांचे मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले याच प्रकरणात अमरावती परिक्षेत्र पोलीस महासंचालक यांनी जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वर निश्चित केली तरीही कारवाई झाली नसल्याने अखेर 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्यावर आत्मदहन करणार असल्याचे पत्र पंतप्रधान यांना दिले होते.
पंतप्रधान कार्यालयाने हे प्रकरण राज्याचे प्रधान सचिव यांना पाठवून न्याय देण्याचा आदेश दिला त्या आदेशानुसार प्रधान सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने पत्र पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले त्या आधारे जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन संबंधित प्रकरणात तपास करणारे अधिकारी व त्या प्रकरणात असलेले आरोपी यांचेवर कारवाई करून गोपाल अग्रवल कुटुंबातील सदस्यांना आत्मदहन करण्यापासून थांबवावे असे सांगितले असले तरीही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अजूनही हालचाल झाली नसल्याने गोपाल अग्रवाल कुटुंब अखेर आजच आत्मदहन करण्यासाठी रवाना झाले असल्याने अकोल्यात खळबळ उडाली आहे.