- अकोला – शहरात व जिल्ह्यातील विविध रस्ते निर्मिती ची कामे वेगाने सुरू आहेत मात्र या रस्ता कामात कोणत्याही प्रकारची तांत्रिक बाजू सांभाळल्या जात नाही त्यामुळे स्थानिक राजकारणी व बांधकाम विभागाचे अधिकारी हे संगनमताने काम नित्कृष्ट करीत असून सर्वसामान्य जनतेच्या पैश्याची उधळपट्टी करीत आहेत तसेच दगडी पूल ते मासुंम शाह चौकापर्यंत च्या रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार हा काळ्या यादीत टाकलेले असतानाही काम करीत असून काम दर्जा हीन आहे याबाबत श्रीराम सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मिथिलेश चव्हाण यांना निवेदन दिले असता त्यांनी त्या रस्त्या संबंधित अधिकारी यांना पाठीशी घालीत रस्ता चांगल्या दर्जाचे असल्याचे सांगितले परंतु श्रीराम सेनेने स्व खर्चाने खाजगी अभियंता यांचेकडून रस्त्याची गुणवत्ता तपासली असता हा रस्ता पूर्णपणे नित्कृष्ट असल्याचे उघड झाले असून कंत्राटदार हा काळ्या यादीतील असल्याने या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची देयक अदा करू नये अशी मागणी श्रीराम सेनेचे महानगर अध्यक्ष रोहित तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे
श्रीराम सेनेच्या या मागणीकडे संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यास श्रीराम सेना आपल्या पध्दतीने आंदोलन करणार असून त्याद्वारे होणाऱ्या नुकसान साठी संबंधित अधिकारी हेच दोषी असतील असेही श्रीराम सेना चे महानगर अध्यक्ष रोहित तिवारी यांनी सांगितले
जर प्रशासनाने देयक अदा केले तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन श्रीराम सेना उभारणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले