तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खापरखेड फाटा येथे प्रवासी ऑटो आणि चारचाकी वाहनाचा अपघात होऊन एक ठार तर 12 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की तेल्हारा येथून पंचगव्हान येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या तीन चाकी ऑटो क्रमांक एम यच 30 जे 3529 तसेच अडसूळ या दिशेने तेल्हारा कडे येणाऱ्या चारचाकी क्रमांक एम एच 30 बी एल 9802 यांच्या मध्ये समोरासमोर धडक झाल्याने ऑटो मधील जवळपास दहा प्रवासी तसेच चारचाकी वाहनामधील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला येथे पुढील उपचारकरिता भरती करण्यात आले आहे यामध्ये मिळालेल्या माहिती नुसार पंचगव्हान येथील दीपक दुबे (38)नामक व्यक्ती मयत झाला असून इतर जणांवर शासकीय रुग्णलाय अकोला तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.या अपघातात चारचाकी चे मोठे नुकसान झाले असुन ऑटोचा अक्षरशः चुराळा झाला आहे.याप्रकरणी पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.