अकोला(प्रतिनिधी)- देशभरात दिवाळी सणाची धामधूम सुरू असून अकोला पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने आगळी वेगळी दिवाळी साजरी केली.
पोलीस म्हटले की मुजोर पैसे खाऊ हप्ते खाऊ म्हटले जाते मात्र अकोला जिल्ह्यातील एक पोलीस अधिकारी याला अपवाद ठरले आहे सविस्तर वृत्त असे की अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे यांनी आगळी वेगळी दिवाळी साजरी केली आहे तेल्हारा तालुक्यातील ग्राम दहिगाव येथील श्रीनाथ वृद्धाश्रम येथे निराधारांना आधार देत साळी चोळी कपड्यांसहित दिवाळीचे फराळ वाटप केले.यावेळी ठाणेदार प्रकाश तूनकुलवार यांच्या हस्ते निराधाराणा फराळ साडी चोळी कपड्यांचे वाटप करण्यात आले.एका पोलीस अधिकाऱ्याने अशा प्रकारे दिवाळी साजरी करण्याची पहिलीच बाब असून त्यांच्या या पुढाकाराने आगळ्या वेगळ्या दिवाळी चे सर्वत्र कौतुक होत असून एक समाजासमोर आदर्श ठेवला आहे यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रकाश तूनकुलवार,पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे,पोलीस उपनिरीक्षक कापसे व कर्मचारी उपस्थित होते.