• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Our Media by Our Media
September 17, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
94 1
0
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
14
SHARES
679
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : महिला ही संपूर्ण कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा, देशाचा आधार असते. महिला सशक्त झाल्याशिवाय सुदृढ भारताची कल्पना करता येणार नाही. त्यामुळे महिलांच्या निरामय आरोग्यासाठी विविध तपासण्या, उपचार व मार्गदर्शनासाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ’स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालय येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, आरोग्य उपसंचालक डॉ.सुशीलकुमार वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. अभिजीत फडणीस आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, कुटुंबात महिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कुटुंबाची काळजी घेता घेता त्यांच्याकडेच दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे महिलाभगिनींचे आरोग्य राखण्यासाठी शासनाने हे अभियान सुरू केले आहे. मधुमेह, कर्करोग, क्षयरोग अशा आजारांच्या नियमित तपासण्या, लसीकरण, उपचार व मार्गदर्शन गावपातळीपासून महानगरापर्यंत शिबिरांच्या माध्यमांतून मिळवून देण्यात येईल. हा उपक्रम अभियानाच्या कालावधीपुरता न ठेवता वर्षभर राबवला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनीही मनोगत व्यक्त केले.

विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन या मोहिमेत आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये तपासणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित केली जातील. जिल्हा रुग्णालय ,जिल्हा स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, प्राथमिक आरोग्‍य केंद्रे येथे विशेषज्ञाव्‍दारे तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत.खाजगी महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना संलग्‍नित रुग्‍णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्‍यात येणार आहेत.

महिलांची आरोग्‍य तपासणी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्‍या निदानासाठी तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्‍या निदानासाठीची तपासणी करणे.जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग (Tuberculosis) तपासणी. किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन.

माता आणि बाल आरोग्‍य सेवा गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC) तपासणी व समुपदेशन करणे.हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन. बालकांचे आवश्‍यकतेनुसार लसीकरण केले जाईल. आयुष सेवा याअंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्‍द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्‍दतींची सेवा गरजू रुग्‍णांना उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.  जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित केली जातील. महिला बचत गट (SHGs) आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन. पोषण समुपदेशन व निरोगी राहण्‍यासाठी मार्गदर्शन.

Previous Post

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

Next Post

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

बंजारा समाजाचा सांस्कृतिक,सामाजिक वारसा प्रेरणादायी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.