पंचगव्हाण (सिद्धार्थ गवारगुरू)- तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण उबारखेड येथे दरवर्षीप्रमाणेच या वर्षी सुध्दा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीची सुरूवात त्रिरत्न बुद्ध विहार उबारखेड येथून सुरुवात करण्यात आली . ऐकच साहेब बाबासाहेब,जयभिम चे नारे लावत मिरवणूक बस स्टॅन्ड चौक, जुने उबारखेड येथून गांधी चौक,मारोती मंदिर दुर्गा माता मंदिर समोरून ग्रामपंचायत आप्पा स्वामी मठ या मार्गाने काढण्यात आली. यावेळेस मिरवणूक मधे ऐकतेचे प्रतिक पाहयला मिळाले श्रीराम गृप चे अध्यक्ष निखिल अग्रवाल,गनेश पानझाडे,आदीत्य अग्रवाल आणि त्याचे मित्र परिवार यांच्या वतीने बौद्ध बांधवांचे शाल श्रीफळ हारार्पण करून सत्कार करण्यात आला.तसेच मुस्लिम बांधव जावेद खान,शेख मुक्तार ,अब्दुल सादीक ,अब्दुल खालीक ,शेख मतिन सादीक खान,मुकदर खान यांच्या वतीने बौद्ध बांधवांचा हारार्पण करून सत्कार करण्यात आला.पंचगव्हाण मधिल सर्व समाज एकत्र आहोत असे भिम जयंती निमित्त यावेळेस पाहयला मिळाले. यावेळी मिरवणूक मधे उबारखेड येथील बौद्ध उपासक उपासिका सम्राट गृप चे सर्व सदस्य उपस्थित होते.तसेच तेल्हारा पो.ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शना खाली अमोल सोळंके म.पो.देवा ईंगळे म.पो.यांनी चोख बंदोबस्त ठेवला .मिरवणूकीची सांगता संध्याकाळी 10 वाजता त्रिरत्न बुद्ध विहार उबारखेड येथे त्रिसरण सह पंचशील सरण्यत सुत्त घेऊन करण्यात आली.