• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

Our Media by Our Media
February 7, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, अर्थकारण, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
102 2
0
RUPEE
15
SHARES
740
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी आज शुक्रवारी (दि. ७) कर्जदारांना मोठा दिलासा दिला. त्यांनी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे आता रेपो दर आता ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे जवळपास पाच वर्षांनंतर रेपो दरात केलेली ही पहिलीच कपात आहे. तर गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची ही पहिलीच पतधोरण बैठक आहे. पतधोरण समितीने रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सनी कमी करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. यामुळे रेपो रेट आता ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला असल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महागाई वाढ लक्ष्यीकरणाबाबत रुपरेखा आखल्यानंतर सरासरी महाईवाढ कमी झाली आहे, असे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेच्या हितासाठी आर्थिक स्थिरता आणि ग्राहक संरक्षण आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आरबीआयच्या पतविषयक धोरण समितीची बैठक ५ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. त्यानंतर आज शुक्रवारी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​यांनी दोन दिवसांच्या पतधोरण बैठकीनंतर (RBI MPC Meeting) रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

महागाईत घट- आरबीआय गर्व्हनर

महागाई कमी झाली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ती आणखी कमी होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अन्नधान्याच्या अनुकूल परिस्थितीमुळे महागाई कमी झाली आहे. निश्चित्य लक्ष्यानुसार ती हळूहळू आणखी कमी होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. “स्थायी ठेव सुविधा म्हणजे SDF दर ६.० टक्के असेल आणि सीमांत स्थायी सुविधा दर (MCF) आणि बँक दर ६.५ टक्के असेल.” असेही मल्होत्रा यांनी सांगितले. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आरबीआयने रेपो दरात ४० बेसिस पॉइंट्सने कपात करुन दर ४ टक्क्यांवर आणला होता. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मे २०२२ मध्ये आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. या दरवाढीला मे २०२३ मध्ये ब्रेक लागला. आरबीआयच्या समितीने ६ डिसेंबर २०२४ रोजी सलग अकराव्यांदा रेपो दर ६.५ टक्के एवढा कायम ठेवला होता.

किरकोळ महागाई ४ टक्क्यांच्या मध्यम मुदतीच्या लक्ष्यापर्यंत खाली आणण्यासाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर स्थिर ठेवला होता. आरबीआयच्या समितीने रोख राखीव प्रमाण म्हणजे सीआरआर (Cash Reserve Ratio) ५० बेसिस पॉइंटने कमी करून ४ टक्के केला होता. विशेष म्हणजे आरबीआयने मार्च २०२० नंतर डिसेंबर २०२४ मध्ये पहिल्यांदाच कॅश रिझर्व्ह रेशो कमी केला होता. दरम्यान, कॅश रिझर्व्ह रेशो कमी केल्याने बँकांकडे रोख प्रवाह वाढतो. सीआरआर वाढल्याचा परिणाम बँकासोबतच सर्वसामान्यांवरही होतो. बँकिंग क्षेत्रातील तरलतेला चालना देण्यासाठी आरबीआयने सीआरआर ४.५ टक्क्यांवरून ४ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. हा निर्णय बँकांना दिलासा देणारा होता.

Previous Post

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

Next Post

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
सुप्रिम

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

पाहुणे येत आहेत पोरी'..'स्थळ' चित्रपटातलं गाणं भेटीला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.