• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकर्‍यांना नववर्षाची भेट..! ‘डीएपी’ खताची पिशवी फक्त 1,350 रुपयांना मिळणार

Our Media by Our Media
January 2, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
91 1
0
शेतकऱ्याला
13
SHARES
657
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे दोन मोठे निर्णय घेतले आहेत. पहिल्या निर्णयानुसार, सरकारने ‘डीएपी’ खताच्या किमती नियंत्रित करण्यासाठी विशेष अनुदान पॅकेजला मंजुरी दिली आहे. दुसर्‍या निर्णयानुसार, सरकारने पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. 3 हजार 850 कोटी रुपयांच्या विशेष अनुदान पॅकेजमुळे 50 किलोची ‘डीएपी’ खताची पिशवी 1,350 रुपयांना मिळणार आहे. खुल्या बाजारात या पिशवीची किंमत तीन हजार रुपयांहून अधिक आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले, बैठकीत शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. 1 जानेवारी 2025 पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्यतिरिक्त डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या कालावधीसाठी 3 हजार 500 रुपये प्रतिमेट्रिक टन दराने ‘डीएपी’ खतपुरवठा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सध्या खुल्या बाजारात खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खुल्या बाजारात ‘डीएपी’च्या एका पिशवीची किंमत 3 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष अनुदान पॅकेजमुळे ‘डीएपी’ खताची पिशवी शेतकर्‍यांना खुल्या बाजारातील भावापेक्षा निम्म्याहून कमी किमतीत मिळणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

‘फियाट’ निधीला सरकारची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 2021-22 ते 2025-26 पर्यंत एकूण 69,515.71 कोटी रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकर्‍यांना आकस्मिक नैसर्गिक आपत्तींमुळे उद्भवणार्‍या जोखमीपासून पिकाचे संरक्षण करायला मदत होईल. या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने 824.77 कोटी रुपयांच्या नवोन्मेष आणि तंत्रज्ञानासाठी (फियाट) निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी पीक नुकसानीचे जलद मूल्यांकन, विमा दाव्यांची निपटारा आणि विवाद कमी करण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाद्वारे संशोधन आणि विकासासाठी वापरला जाईल. यामुळे पीक विम्याच्या दाव्यांची गणना आणि निकालात पारदर्शकताही वाढेल. 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पीएम पीक विमा योजनेचा लाभ घेत आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले.

‘येस-टेक’ प्रणालीचा वापर

तंत्रज्ञानावर आधारित उत्पन्न अंदाज प्रणाली (येस-टेक) सध्या वापरली जात आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पन्नाचा अंदाज वर्तवला जातो. सध्या महाराष्ट्रासह 9 प्रमुख राज्ये या प्रणालीची अंमलबजावणी करत आहेत. हवामान माहिती आणि नेटवर्क डेटा प्रणालीअंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र ब्लॉकस्तरावर, तर स्वयंचलित पर्जन्यमापक पंचायतस्तरावर स्थापित करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

अकोला : वाहन तपासणीसाठी तालुकास्तरीय शिबिरे

Next Post

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

खंडवा-अकोट रेल्वेमार्ग

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.