पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने पेन्शनधारकांसाठी राष्ट्रव्यापी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम ३.० सुरु केली आहे. ही मोहीम १ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भारतातील ८०० शहरांमध्ये चालवली जाईल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे पेन्शनधारक, ईपीएफओधारक आणि स्वायत्त संस्था पेन्शनधारक त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शन वितरण बँक किंवा आयपीबीमध्ये सहजपणे सबमिट करू शकतात.
जीवन प्रमाणपत्र कसे बनवायचे?
- अँप डाऊनलोड करा तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर जीवन प्रमाण अँप डाऊनलोड करा किंवा जवळच्या जीवन प्रमाण केंद्राला भेट द्या.
- आवश्यक माहिती द्या आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक तपशील आणि मोबाईल नंबर यासारखी माहिती प्रविष्ट करा.
- आधार प्रमाणीकरण : तुमचे बायोमेट्रिक तपशील प्रदान करा, जसे की फिंगरप्रिंट किंवा बुबुळ स्कॅन. जीवन प्रमाण आधार प्लॅटफॉर्म वापरून ऑनलाइन प्रमाणीकरण करते.
- लाइफ सर्टिफिकेट : एकदा ऑथेंटिकेशन यशस्वी झाले की, जीवन प्रमाण प्रमाणपत्र आयडी तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जातो. हे प्रमाणपत्र लाइफ सर्टिफिकेट रिपॉजिटरीमध्ये साठवले जाते, जे कधीही आणि कोठेही ऍक्सेस केले जाऊ शकते. जीवन प्रमाण वेबसाईटला भेट द्या, प्रमाणपत्र आयडी प्रविष्ट करा आणि पीडीएफ डाऊनलोड करा. ही प्रक्रिया निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्रे तयार करणे सोपे आणि सोयीस्कर बनवते, त्यांना मॅन्युअल प्रमाणपत्रांच्या त्रासापासून वाचवते.
- पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. केंद्र दव राज्य सरकारकडून दरमहा मिळणारी पेन्शन पुढे सुरू राहण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना नोव्हेंबर महिन्यात त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने पेन्शनधारकांसाठी राष्ट्रव्यापी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम ३.० सुरू केली आहे. ही मोहीम १ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भारतातील ८०० शहरांमध्ये चालवली जाईल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे पेन्शनधारक, ईपीएफओधारक आणि स्वायत्त संस्था पेन्शनधारक त्यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पेन्शन वितरण बँक किंवा आयपीपीबीमध्ये सहजपणे सबमिट करू शकतात.
सुपर सीनिअर पेन्शनधारकांसाठी (ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे) एक विशेष सुविधा आहे, ज्याद्वारे ते त्यांच्या घरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात आणि घरोघरी सेवा घेऊ शकतात. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व पेन्शन वितरण बँका, सीजीआयए, आयपीपीबी आणि युआयडीएआय एकत्रितपणे काम करत आहेत. या अंतर्गत, सर्व सरकारी कार्यालये आणि बँक शाखा/एटीएममध्ये बॅनर आणि पोस्टर्स लावले जात आहेत. सर्व बँकांनी त्यांच्या शाखांमध्ये एक विशेष टीम तैनात केली आहे, ज्यांच्याकडे स्मार्टफोनवर आवश्यक अँप उपलब्ध आहेत. ही टीम पेन्शनधारकांच्या जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे वय, आजार किंवा अशक्तपणामुळे बँकेच्या शाखांना भेट देता येत नसेल तर बँकेचे अधिकारी त्यांच्या घरी किंवा रुग्णालयात भेट देऊन जीवन प्रमाणपत्रे गोळा करत आहेत. संघटनेचे प्रतिनिधी पेन्शनधारकांना जवळच्या कॅम्पला भेट देऊन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यास प्रवृत्त करत आहेत. पेन्शनधारकांना डिजिटल पद्धती वापरण्यास मदत करण्यासाठी पेन्शनर्स कल्याण विभागाचे अधिकारी देशभरातील प्रमुख ठिकाणी भेटी देत आहेत आणि त्यांच्या प्रगतीची माहिती घेत आहेत.
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ३.० मोहिमेवर सतत लक्ष ठेवून, ३७ लाखांहून अधिक प्रमाणपत्रे तयार झाली आहेत. विशेषतः ९० वषपिक्षा जास्त वयाच्या १४,३२९ निवृत्तीवेतनधारकांसाठी आणि ८०-९० वर्षांच्या १,९५,७७१ निवृत्तीवेतनधारकांसाठी हा एक मोठा दिलासा देणारा ठरत आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे आणि या मोहिमेअंतर्गत, निवृत्तीवेतनधारकांना त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवण्याची गरज नाही, ज्यामुळे त्यांना बरीच सोय झाली आहे.
जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाने अंतिम मुदतीत त्याचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्याचे पेन्शन थांबवले जाऊ शकते. त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या जवळच्या सीएससी केंद्र, बँक शाखा किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात भेट द्यावी लागेल आणि आधार क्रमांक आणि पेन्शन खात्याच्या तपशीलासह बायोमेट्रिक पद्धतीने जीवन प्रमाणपत्राची पडताळणी करावी लागेल. यासाठी, https://jeevanpramaan.gov.in/ या वेबसाइटवरील लोकेट सेंटर या पर्यायामध्ये सर्व केंद्रांची माहिती उपलब्ध आहे.
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन सबमिट करण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्या देखील फॉलो करू शकता. जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सबमिट करण्यासाठी, पेन्शनधारकाने प्रथम जीवन सन्मान पोर्टलवर जाणे आणि जीवन प्रमाण अँप डाउनलोड करणे आवश्यक आहे. जीवन प्रमाण आधार प्लॅटफॉर्म वापरून पेन्शनधारकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करते. यशस्वी प्रमाणीकरणानंतर, डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार केले जाते, जे जीवन प्रमाणपत्र भांडारात साठवले जाते. पेन्शन वितरण एजन्सी ऑनलाईन प्रवेश करू शकते.