अकोला,दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 43 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, एकूण 70 उमेदवार प्रत्यक्ष लढवत आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिली. ते म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाकडील दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रेस नोटद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या कालावधीत एकूण 129 उमेदवारांकडून 180 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. दि. 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या छाननीत एकूण 16 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरविण्यात आले होते, एकूण 113 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. सदर 113 उमेदवारांपैकी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत दि. 4 नोव्हेंबर दु. 3 वा. पर्यंत एकूण 43 उमेदवारांपैकी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, एकूण 70 उमेदवार हे प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत, असे त्यांनी सांगितले. बाळापूर येथे उमेदवारांची संख्या अधिक असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची संख्या 15 किंवा त्यापेक्षा कमी असल्याने एक बॅलेट युनिट राहील.
बाळापूर :
नितीन भिकनराव देशमुख़, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), बळीराम भगवान सिरस्कार (शिवसेना, धनुष्यबाण), कु. भाग्यश्री बाबाराव गवई (बहुजन समाज पार्टी, हत्ती), मंगेश गजानन गाडगे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन), उमेश किसन नंदाने (भारतीय जनसम्राट पार्टी, डोली), खतीब सैय्यद नातिकोद्दीन (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), प्रमोद रमेश कदम (भारतीय अस्मिता पार्टी, ऑटोरिक्षा), विश्वनाथ अर्जुन जावरकार (राष्ट्रीय समाज पक्ष, शिट्टी), सुरेश ग्यानुजी डोंगरे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमॉक्रॅटिक, फळांची टोपली), अनिल शांताराम तेजा (अपक्ष, नारळाची बाग), अनंता नारायण फाटे (अपक्ष, बॅट), कृष्णा गोविंदराव अंधारे (अपक्ष, टेबल), शेख कलीम जफर (अपक्ष, दूरदर्शन), रईस अहमद शेख नूरा (अपक्ष, एअर कंडिशनर), रमेश महादेव उभे (अपक्ष, कपाट), राजकुमार रामभाऊ शेळके (अपक्ष, स्पॅनर), राजनारायण रतन कांबळे (अपक्ष, बादली), विनोद बाबुराव सिरसाट (अपक्ष, खाट), श्रीकृष्ण रामदास घ्यारे (अपक्ष, शाळेचे दप्तर), सुनील किसनराव सिरसाट (अपक्ष, ऊस शेतकरी).
अकोला पूर्व :
गोपाल उर्फ आशिष रामराव दातकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), रणधीर प्रल्हादराव सावरकर (भारतीय जनता पार्टी, कमळ), हर्षल देवानंद दामोदर (बहुजन समाज पार्टी, हत्ती), जीवन पुनाजी गावंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) (फळांची टोपली), ज्ञानेश्वर शंकर सुलताने (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), अजाबराव रामराव ताले (अपक्ष, दुरदर्शन), ॲड. संजय गोपाळराव आठवले (अपक्ष, टेबल), गणेश गंगागिर गिरी, (अपक्ष, कपाट), भानुदास चोखोबा कांबळे (अपक्ष, ऑटो रिक्षा), राहुल भिमराव तायडे (अपक्ष, बॅट), विजय श्रीकृष्ण मालोकार (अपक्ष, हिरा),
अकोट :
गणगणे महेश सुधाकरराव (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), प्रकाश गुणवंतराव भारसाकळे (भारतीय जनता पार्टी, कमळ), ॲड. सुजाता विद्यासागर वानखडे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), कॅप्टन सुनील डोबाळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन), दिपक रामदास बोडखे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), ललित सुधाकरराव बहाळे (स्वतंत्र भारत पक्ष, किटली), अन्सारउल्ला खाँ अताउल्ला खाँ (अपक्ष, गॅस शेगडी), गोपाल जीवनराव देशमुख (अपक्ष, रोड रोलर), नितीन मनोहर वालसींगे (अपक्ष, एअर कंडिशनर), रामप्रभू गजानन तराळे (अपक्ष, सफरचंद), लक्ष्मीकांत गजानन कौठकर (अपक्ष, ऑटो रिक्षा)
अकोला पश्चिम :
विजय कमलकिशोर अग्रवाल (भारतीय जनता पार्टी, कमळ), डॉ. धनंजय प्रल्हादराव नालट उर्फ बाबा नालट (बहुजन समाज पार्टी, हत्ती), साजिदखान पठाण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात), अशोक मधुकर ओळंबे (प्रहार जनशक्ती पक्ष, बॅट), दिनेश शंभुदयाल श्रीवास (लोकतांत्रिक जनाधार पार्टी, ऑटोरिक्षा), प्रा. सुमनताई मधुकर तिरपुडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटिक, फळांची टोपली), मो. सोहेल मो. हुसेन (सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, एअर कंडिशनर), प्रशांत अरूण मगर उर्फ प्रेम पाटील (अपक्ष, पेनाची निब सात किरणांसह), बंसीलाल गुलाहीराम प्रजापती (अपक्ष, हंडी), ॲड. भगवान ईश्वर दंदी (अपक्ष, किटली), राजेश कृपाशंकर मिश्रा (अपक्ष, प्रेशर कुकर), सुनिल वसंतराव सिरसाठ (अपक्ष, रूम कुलर), हरिष रतनलाल आलिमचंदानी (अपक्ष, गॅस शेगडी).
मुर्तिजापूर :
भिकाजी श्रावण अवचार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन), रमेश विश्वनाथ इंगळे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), सम्राट डोंगरदिवे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तुतारी वाजवणारा माणूस), हरिष मारोतीआप्पा पिंपळे (भारतीय जनता पार्टी, कमळ), किशोर ज्ञानेश्वर तायडे (देश जनहित पार्टी, शाळेचे दप्तर), श्रावण कुंडलिक खंडारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया, (डेमोक्रॅटीक) (फळांची टोपली), सचिन धनराज कोकणे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया – ए, कपाट), सम्राट माणिकराव सुरवाडे (एमआयएम, पतंग), सुगत ज्ञानेश्वर वाघमारे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), सौ. अंकिता राजू शिंदे (अपक्ष, दूरदर्शन), प्रा.डॉ. धनराज रामचंद्र खिराडे (अपक्ष, अंगठी), यशवंत गोविंद इंगोले (अपक्ष, गॅस शेगडी), रवि रमेशचंद्र राठी (अपक्ष, बॅट), राजश्री हरिष खडसे (अपक्ष, ऑटो रिक्षा), शैलेश रूपराव वानखडे (अपक्ष, हिरा) विधानसभा निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.
अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांचा तपशील :
जिल्ह्यातील 5 मतदार संघांत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल वैध 113 अर्जांपैकी 43 व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली. आता 70 उमेदवार कायम आहेत. अकोला पूर्व (उमेदवारी मागे घेतलेले 6 व निवडणूक लढविणारे 11 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून विशाल भगवान पाखरे, महेश भगवंतराव महल्ले, महेंद्र रमेश भोजने, बुद्धभूषण दशरथ गोपनारायण, सुभाषचंद्र वामनराव कोरपे, संजय वसंतराव वानखडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
अकोला पश्चिम : (उमेदवारी मागे घेतलेले 7 व निवडणूक लढविणारे 13 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून संजय बाबुलाल बडोणे, प्रकाश त्र्यंबकराव डवले, मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग, नंदकिशोर रामकृष्ण ढोरे, मदन बोदुलाल भरगड, जिशान अहमद हुसेन, नकीर खान अहमद खान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
बाळापूर (उमेदवारी मागे घेतलेले 6 व निवडणूक लढविणारे 20 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून प्रकाश मोतीराम डिवरे, अरविंद मोतीराम महल्ले, राजेश दादाराव देशमुख, शिवकुमार रतिपालसिंग बायस, शेख अहमद शेख शब्बीर, अमोल प्रमोद घायवट यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
अकोट : (उमेदवारी मागे घेतलेले 8 व निवडणूक लढविणारे 11 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी रामकृष्ण लक्ष्मण ढिगर, यशपाल यशवंत चांदेकर, गजमफरखाँ मुजफ्फर खाँ, दिवाकर बळीराम गवई, देवेंद्र अशोकराव पायघन, सुभाष श्रीराम रौंदळे, डॉ. गजानन शेषराव महल्ले, सय्यद यावर अली सय्यद मुकद्दर अली यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले.
मुर्तिजापूर (16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. निवडणूक लढविणारे 15 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून अरूण सखाराम गवई, गजानन शिवराम वझिरे, गोपाळराव हरिभाऊ कटाळे, गयाराम बोंदरू घोडे, पुष्पाताई महादेवराव इंगळे, पंकज ओंकार सावळे, भाऊराव सुखदेवराव तायडे, महादेव बापुराव गवळे, महेश पांडुरंग घनगाव, रविंद्र नामदेव पंडीत, राजकुमार नारायण नाचने, राजेश तुळशीराम खाडे, विनोद बाबुलाल सदाफळे, सिध्दार्थ ब्रम्हदेव डोंगरे, सुनिल जानराव वानखडे, संतोष देविदास इंगळे यांनी अर्ज मागे घेतले.