अकोला,दि.12 : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) जिल्हा रानभाजी महोत्सव स्वातंत्र्यदिनी अर्थात गुरूवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दु. 3 या वेळेत येथील मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात होणार आहे. आरोग्यासाठी पोषक असलेल्या अनेक रानभाज्या या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
नागरिकांना रानभाज्यांची ओळख, आरोग्यविषयक महत्व व जनजागृतीसाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शेतकरी, तसेच शेतकरी गटांमार्फत रानभाज्या विक्री केली जाईल. जिल्ह्यातून अधिकाधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.