तेल्हारा (प्रतिनिधी)- राजकीय पाठबळामुळे तक्रारकर्त्यांचे मनोबल वाढल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तथा जि प सदस्य गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी चे जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते मागे घेण्यात यावे या संदर्भात तहसीलदार तेल्हारा मार्फत जिल्हाधिकारी व ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तथा जि. प. सदस्य गोपाल दातकर यांचे विरोधात खोटा अॅक्ट्रासिटी गुन्हा पो. स्टे. ला दाखल झालेला आहे. या आधी सुध्दा सदर तक्रारदाराने हिंगणी बु. ग्रा. पं. च्या सदस्या सौ. किरणताई नितीन चाकोते विरोधात सुध्दा खोटा अॅक्ट्रासिटीचा गुन्हा दहिहांडा पो. स्टे ला दि. २२/ ०३/२०२४ ला दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणात ओ.बी.सी. लाभार्थीच्या घरकुला करीता नमुना ८ अ मिळणे बाबत चा विषय होता. तक्रारदारास वरिष्ठ स्तरावरुन पाठबळ असल्याने असे खोटे गुन्हे दाखल होत आहेत. संबंधित तक्रारदाराने हिंगणी बु. गावातील लोकांविरोधात दहीहांडा पो. स्टे., सिटी कोतवाली पो. स्टे. ला अनेक खोठ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांविरोधात सुध्दा पो. स्टे. ला तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यांन विरोधात सुध्दा तक्रारदाराने तक्रारी दाखल केल्या आहेत. संबंधित तक्रारदार सरपंच असून सुध्दा खोटया तक्रारी करण्यात त्यांची पी.एच.डी. झालेली दिसते.
आपण तथाकथीत घटनेची सखोल चौकशी करुन व तक्रारदाराची पार्श्वभूमी तपासून खोठ्या अॅक्ट्रासिटीचा गुन्हा रद्द करण्यात यावा व यापुढे खोटया तक्रारी करणाऱ्या तक्रारदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन कुनबी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना जि. प. सदस्य गजानन काकड कुणबी समाज संघटना तालुका अध्यक्ष संदीप खारोडे शहर अध्यक्ष रामेश्वर हागे महेंद्र कराळे राजेश मोरे पप्पू दातकर बाळासाहेब कौसल अनिल तायडे गोपाल पाकधुणे दत्ता धारकर अरुण कोरडे रामभाऊ फाटकर बळीराम उजाळ वैशालीताई इंगोले डॉ. प्रतिभाताई वाकोडे प स सदस्य जयश्रीताई लांडे राजेश दातकर शिवा दातकर स्वप्निल सुरे अंकुश खळसान लखन सोनटक्के कैलास पांडे विद्याधर भारसाकडे रामदास कोरडे वैभव वानखडे यश महाले हर्षल दिघे अंकुश बुरघाटे गणेश तिव्हाने विशाल ठाकरे योगेश नागडे समाधान गावंडे राहुल नागडे निलेश जवकार गजाननराव महाले गोकुळ हिंगणकर संतोष दुतोंडे प्रा. उज्वल दबडगाव कैलास पोटे अभिषेक धांडे राजीव बगले बंटी राऊत इत्यादी कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.