• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी-जिल्हाधिकारी अजित कुंभार

Our Media by Our Media
June 24, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
94 1
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
14
SHARES
676
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :- जिल्ह्यात एक जुलै २०२४ या अर्हता दिनांकावरील मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
असा आहे कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यकम जाहीर करण्यात आला आहे. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्याव्‍दारा प्रत्‍यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 25 जून ते दि. 24 जुलैदरम्यान करण्यात येईल. त्यात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी, ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे व आयोगाच्‍या मानकानुसार छायाचित्र प्राप्‍त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच अस्‍पष्‍ट छायाचित्र बदलणे, केंद्राच्‍या यादीस मान्‍यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे आदी कामे केली जातील.

एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी दि. 25 जुलै रोजी सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये आदी ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ही यादी उपलब्ध असेल. त्यानंतर दि. 9 ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्विकारण्‍यात येतील. या कालावधीत शनिवार व रविवारी विशेष मोहिमाही राबवल्या जातील. दि. 19 ऑगस्टपूर्वी दावे व हरकती निकालात काढल्या जातील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी दि. 20 ऑगस्ट रोजी होईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मतदान केंद्र सुसूत्रीकरणः

  • ज्‍या मतदान केंद्रांवर 1500 पेक्षा अधिक मतदार असतील अशा तसेच ज्‍या मतदान केंद्रांच्‍या इमारती नादुरुस्‍त/शिकस्‍त अथवा ज्‍या मतदान केंद्रांवर मुलभूत सुविधा उपलब्‍ध नसतील अशा मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्‍यात येणार असून आवश्‍यकतेनुसार नवीन मतदान केंद्र तयार करण्‍यात येणार आहेत.
  • प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर सदर यादीची तपासणी करुन सर्व मतदारांनी आपली नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत व त्यातील तपशील योग्य असल्याबाबत खात्री करावी. दि. 1 जुलै 2024 रोजी वा त्यापुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण होणाऱ्या तसेच ज्या मतदारांची नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत अशा पात्र व्यक्तींनी आपले नांव नोंदविण्यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 6 सादर करावा अथवा मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेल्या voters.eci.gov.in या संकेत स्थळाचा / voter helpline या App चा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापर करावा.
  • विहित नमुने जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे उपलब्ध करुन दिले आहेत.
  • त्याचप्रमाणे, मयत किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नांवे वगळणी करणेकरीता विहीत नमुना 7 आवश्यक कागदपत्रांसह भरुन द्यावा, मतदारांच्या मतदार यादीमधील तपशीलामध्ये दुरुस्ती करणे, पत्ता बदलणे, नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळविणे इत्यादी साठी आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 8 मध्ये अर्ज संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी/ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करता येईल.
  • ज्या मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नोंदीशी त्यांचा आधार क्रमांक स्वयंस्फूर्तीने संलग्न करावायाचा आहे, त्यांनी विहित नमुना क्र. 6 किंवा 8 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसिलदार कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post

खासदार अनुपभाऊ धोत्रे यांचा पातूर येथे सत्कार व आभार

Next Post

शेतकरी बांधवांच्या शंका निरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री कक्ष

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ उपक्रमाबाबत 5 डिसेंबरला कार्यशाळा

शेतकरी बांधवांच्या शंका निरसनासाठी कृषी विभागाचा टोल फ्री कक्ष

‘बार्टी’ मार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रवेश प्रक्रीया सुरु

‘बार्टी’ मार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रवेश प्रक्रीया सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.