• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Buldhana

सिंदखेडराजा येथे उत्खननात आढळली भगवान विष्णुची दुर्मिळ मूर्ती

Our Media by Our Media
June 21, 2024
in Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
129 1
0
सिंदखेडराजा येथे उत्खननात आढळली भगवान विष्णुची दुर्मिळ मूर्ती
19
SHARES
932
VIEWS
FBWhatsappTelegram

बुलढाणा : जिजाऊ माँसाहेबांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधव यांचा समाधीस्थळ परिसर विकसित करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने सिंदखेडराजा येथे उत्खनन सुरू आहे. या दरम्यान शेषनागावर पहूडलेल्या शंख, चक्र, गदाधारी  भगवान विष्णुची अतिशय कलात्मक व पौराणिक मूर्ती आढळून आली आहे.

मूर्तीची अशी आहेत वैशिष्ट्ये

पौराणिक शिल्प एकाच दगडात कोरलेले आहे. कमळावर ब्रम्हा तर मूर्तीच्या मस्तकावर शेषनागाचा फणा समुद्रमंथनाचे दृश्य साकारलेले दुर्मिळ प्रकारातील रेखीव शिल्प भगवान विष्णुची चरणसेवेत बसलेली लक्ष्मी व सोबतच समुद्रमंथनाचे दृश्य साकारलेले दुर्मिळ प्रकारातील रेखीव शिल्प पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे हे पौराणिक शिल्प एकाच दगडात कोरलेले आहे. ते अन्यत्र स्थलांतरीत करू नये. सिंदखेडराजा येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. भगवान विष्णु मुर्तीच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रम्हा तर मूर्तीच्या मस्तकावर शेषनागाचा फणा आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंदखेडराजा शहरात अलिकडील उत्खननादरम्यान अनेक मूर्ती आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी महादेवाची पिंड व मंदिराचा चौथरा मातीखाली दबलेला आढळून आला होता. त्यानंतर या उत्खननाची व्याप्ती वाढवण्यात आली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

राजे लखुजीराव जाधव यांची समाधी सोळाव्या शतकात बांधली

राजे लखुजीराव जाधव यांची सर्वात मोठी दगडी बांधकाम असलेली ही समाधी सोळाव्या शतकात बांधण्यात आलेली आहे. जगातील हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी म्हणून या स्थळाचा उल्लेख होतो. या स्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी याच समाधी परिसरात सध्या केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन सुरू आहे. याच उत्खननात मागील महिन्यात शिवपिंड आढळून आल्यानंतर येथे सुरू असलेले उत्खनन अधिक काळजीपूर्वक व गांभीर्याने केले जात आहे.

संपूर्ण मंदिराचा चौथरा येथे आढळला

शिवपिंड मिळालेला परिसर खोदण्यात आल्यानंतर संपूर्ण मंदिराचा चौथरा येथे आढळला. तो पायापर्यंत खोदला जात असताना चार दिवसापूर्वी अत्यंत रेखीव कलाकुसर असलेली भगवान विष्णुची विश्राम अवस्थेतील मूर्ती, पायाजवळ सेवारत लक्ष्मीची मूर्ती आढळून आल्यानंतर केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षणचे नागपूर येथील अधीक्षक अरूण मलिक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिंदखेडराजा येथे भेट देवून उत्खननातून भगवान विष्णु ची मुर्ती बाहेर काढण्याचे काम केले. सोबत असलेल्या तज्ज्ञांना मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधीक्षक अरुण मलिक यांनी सांगितले की, ही मूर्ती कुठे ठेवली जाणार हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. यावेळी पुरातत्व सहायक शिल्पा दामगडे, शाम बोरकर, शाहीद अख्तर, दीपक सुरा आदी उपस्थित होते.

Previous Post

जिल्हाधिकारी यांच्या पुढकाराने ग्रीन अकोला अंतर्गत पहिले स्वस्तिक पॅटर्न तेल्हारा तहसील मध्ये

Next Post

खासदार अनुपभाऊ धोत्रे यांचा पातूर येथे सत्कार व आभार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
खासदार.अनुपभाऊ धोत्रे

खासदार अनुपभाऊ धोत्रे यांचा पातूर येथे सत्कार व आभार

जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी-जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.