• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव

Our Media by Our Media
June 13, 2024
in Amravati, Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
812 9
0
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
117
SHARES
5.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

अग्निवीर योजना लागू झाल्यापासून ती चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही सैन्य भरती योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अग्निवीर योजनेत काही बदलांची चर्चा सुरू असल्याचे कळते. या बदलांमध्ये अग्निवीरचा प्रशिक्षण कालावधी वाढवून 25 टक्के सैनिकांना कायम करण्याचा नियम देखील समाविष्ट आहे. या सूचना लष्कराने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणावर आधारित आहेत, ज्यामध्ये तिन्ही सैन्य दलांकडून अभिप्राय घेण्यात आला होता. मात्र, लष्कराने अद्याप या शिफारशी अधिकृतपणे केंद्राकडे पाठवलेल्या नाहीत आणि सुरक्षा दलांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.

60 ते 70 टक्के अग्निवीरांना कायम करावे

एका रिपोर्टनुसार, लष्करात सुरू असलेल्या चर्चेतील सर्वात मोठा मुद्दा अग्निवीर सैनिकाला कायम करण्याचा आहे. लष्करात केवळ 25 टक्के अग्निवीरांना कायम केले जाते, असा नियम सध्या आहे. मात्र ही मर्यादा 60 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढवली जावी याची शिफारस करण्यात आल्याचे समजते आहे. शिवाय विशेष दलांसह तांत्रिक व तज्ज्ञ सैनिकांचा समावेश करून ते 75 टक्के झाले पाहिजे असेही म्हटले आहे. अग्निवीर योजना लागू होऊन दीड वर्ष झाले असून या दीड वर्षांत या योजनेचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमए म्हणजेच लष्करी व्यवहार विभागाने तिन्ही लष्करांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चार वर्षांचा कार्यकाळ वाढवणे, अधिक भरती करणे आणि 25 टक्के अग्निवीरांना कायम ठेवण्याची मर्यादा वाढवणे अशी चर्चा आहे. याशिवाय प्रशिक्षणादरम्यान किंवा कर्तव्यावर असताना अग्निवीराचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एवढेच नाही तर नियमित लष्करी जवान आणि अग्निवीर यांना दिलेल्या रजेतील फरकही बदला जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, एका नियमित लष्करी जवानाला वर्षभरात 90 दिवसांची रजा मिळते, तर अग्निवीर जवानाला वर्षातून फक्त 30 दिवसांची रजा मिळते. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला बाहेर पडण्यासाठी अजून अडीच वर्षांचा अवधी आहे, त्यामुळे काही बदल करायचे असतील तर ते पहिली बॅच बाहेर पडण्यापूर्वीच करावेत जेणेकरून अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला त्याचा फायदा मिळू शकेल, याचाही आढावा घेतला जात आहे.

बदल झाला तर गोरखा सैनिकांना दिलासा

ही योजना अस्तित्वात आल्यापासून नेपाळमध्ये एकही भरती मेळावा आयोजित केलेला नाही. कोरोनाच्या काळात जवळपास अडीच वर्षे आणि अग्निवीर योजना लागू झाल्यापासून जवळपास दीड वर्ष म्हणजेच गेल्या चार वर्षांपासून नेपाळी गोरखा सैनिकांची भारतीय सैन्यात भरती झालेली नाही. एका भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्यापूर्वी गोरखा रेजिमेंटमधील सुमारे 90 टक्के गोरखा सैनिक नेपाळचे होते आणि 10 टक्के भारतीय गोरखा होते. पुढे ही टक्केवारी 80:20 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर यात बदल झाले आणि ही टक्केवारी 60:40 पर्यंत करण्यात आली. त्यानुसार 60 टक्के नेपाळी अधिवास गोरखा आणि 40 टक्के भारतीय अधिवास गोरखा यांना रेजिमेंटमध्ये स्थान मिळते.

Previous Post

NEET विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

तुषार व ठिबक संचासाठी महाडीबीटीवर अर्ज घेणे सुरू जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तुषार व ठिबक संचासाठी महाडीबीटीवर अर्ज घेणे सुरू जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

तुषार व ठिबक संचासाठी महाडीबीटीवर अर्ज घेणे सुरू जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

फळपिकांची प्रलंबित नुकसानभरपाई मिळणार !

फलोत्पादन अभियानात तरतूद अनु. जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज करावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.