‘18 वी लोकसभा देशाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. एनडीए सरकारला देशाची सेवा करण्याचा जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. आमच्या सरकारच्या सलग तिसऱ्या कार्यकाळात देशाच्या विकासात कोणतीही कमी ठेवणार नाही, असे प्रतिपादन संसदीय पक्ष आणि एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मोदी पुढे म्हणाले की, ‘आझादी का अमृत महोत्सवानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. तिसऱ्यांदा एनडीए सरकारला जनतेने देशसेवेची संधी दिली. गेल्या दोन टर्ममध्ये, ज्या वेगाने देश पुढे गेला आहे त्याच वेगाने देश पुन्हा विकास कामे मार्गी लावणार आहोत. प्रत्येक क्षेत्रात बदल दिसून येतील. याची मी देशातील जनतेला खात्री देतो,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.