• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या पुरातन मुर्त्या पादुका, बांगड्यांचे तुकडे, नाणी

Our Media by Our Media
May 31, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
138 1
0
विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या पुरातन मुर्त्या पादुका, बांगड्यांचे तुकडे, नाणी
20
SHARES
994
VIEWS
FBWhatsappTelegram

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धनाचे व सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या गर्भगृहातील काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या 2 जूनपासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लावून बसले असतानाच विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु असतानाच एक दगड खचला. तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले. या तळघरात मोठ्या तीन तर लहान दोन मूर्ती सापडल्या आहेत. त्याचबरोबर पादुका, बांगड्याचे तुकडे, पैशाची जुनी नाणी सापडली आहेत.

तळघरात नेमकं काय काय सापडले?

  • मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे तळघर
  • 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले
  • तळघरात मोठ्या तीन तर लहान दोन मूर्ती सापडल्या आहेत.
  • पादुका, बांगड्याचे तुकडे, पैशाची जुनी नाणी सापडली आहेत.

तळघर की भुयारी मार्ग? या प्रश्नांची उत्सुकता संपली

त्यामुळे या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे. या प्रश्नांची उत्सुकता संपली आहे. पुरातत्व विभाग व वास्तू विशारद तसेच मंदिर समितीचे अधिकारी यांच्या उपस्थित दुपारी ५.१५ वाजता तळघरात काय आहे, हे तपासण्याचे काम सुरू केले. प्रथम लहान दोन मुर्त्या सापडल्या. त्यानंतर पादुका सापडली. यानंतर तळघरात चूनामाती, बांगड्या चे काच तुकडे सापडले. त्यानंतर पैशाची जुनी नाणी सापडली. तर आणखी आता उतरून पाहिले असता विष्णू, व्यंकटेश व महिषासूर मर्दिनी अवतारातील चार फूट उंचीच्या मुर्त्या सापडल्या आहेत. आणखी शोध काम सुरू आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी तीन टप्प्यात काम

दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामाला 15 मार्च पासून सुरुवात झालेली आहे. याकरीता श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शनही बंद करण्यात आलेले आहे. तर सकाळी 6 ते 11 या वेळेतच केवळ मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील संवर्धन व सुशोभिकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फरशीचे व भिंतीच्या दगडांचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु होते. दगडी फरशीचे फ्लोरिंग करीत असताना एक दगड खाली दबला गेला. तेथे पोकळी निर्माण झाली. तेव्हा तो दगड बाजुला काढून घेण्यात आला. तेव्हा त्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली. फ्लोरिंग करणार्‍या कर्मचार्‍यांनी बॅटरीच्या प्रकाशझोतात पाहिले असता येथे तळघर असल्याचे दिसून आले आहे.

तळघरात मूर्ती सदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

या तळघरात मूर्ती सदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र, एकच दगड काढून पाहणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे तळघर आहे की भुयार आहे. याबाबत नेमके सांगता येत नाही. तसेच या सहा बाय सहा च्या तळघरात कशाची मुर्ती आहे. हे समजू शकलेले नव्हते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी मंदिर समितीने पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती. त्यानुसार दुपारी ५.१५ वाजता मंदिर समितिचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, वास्तुविशारद तेजस्वीनी आफळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महाराज मंडळी, तज्ञ यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली आहे. असाही एक अंदाज वर्तवला जात आहे की, मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यातसाठीश्री विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होती. मुर्ती ठेवण्यासाठीचेच हे तळघर आहे का ? याबाबतही माहिती घेतली जात आहे.

Previous Post

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

Next Post

खूषखबर! आला रे आला…मान्सून महाराष्ट्रात आला…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Heavy-rain

खूषखबर! आला रे आला...मान्सून महाराष्ट्रात आला...

सूर्या इन्व्हेस्टमेंटवर ईडीची कारवाई 38 कोटींची संपत्ती जप्त

सूर्या इन्व्हेस्टमेंटवर ईडीची कारवाई 38 कोटींची संपत्ती जप्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.