• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भरारी पथकांच्या कार्यवाहीला गती अकोट तालुक्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त

Our Media by Our Media
May 30, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
273 3
0
भरारी पथकांच्या कार्यवाहीला गती अकोट तालुक्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त
39
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.30 : कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या पथकाने् केलेल्या दोन कारवायांत दोषी आढळलेल्या दोन विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस बियाणे जप्त

अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर) यांच्या शेतातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याबाबत गुप्त खबर जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी बुधवारी (29 मे) दुपारी.4 वा. च्या सुमारास मोहीम अधिकारी महेंद्रकुमार साल्के, ,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतिशकुमार दांडगे, कृषी अधिकारी भरत चव्हाण व अकोट ग्रामीण पोलीसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात बोगस कापुस बियाण्याची 75 हजार 200 रू. ची एकुण 47 पाकिटे जप्त करण्यात आली.निर्मल तोमर (ठाकूर ) रा .उमरा ता .अकोट यांच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जादा दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील अश्विनी ऍग्रो एजन्सी (प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे) या बियाणे विक्री केंद्रातून अजित-155 बीजी 2 या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याबाबत माहिती मिळताच भरारी पथकाने तत्काळ कार्यवाही केली. मंगळवारी दुपारी 12 वा. च्या सुमारास मोहिम अधिकारी महेंद्रकुमार साल्के यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पथकाने डमी ग्राहकांच्या माध्यमातून या बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला.

छाप्यात अजित सीड्स उत्पादित संकरित कापूस बियाणे वाण अजित -155 बीजी 2 ची प्रति पाकीट 1 हजार 400 रु. याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे कृषी अधिकारी श्री. चव्हाण यांच्या तक्रारीवरून विक्री केंद्राचे प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983,कापुस बियाणे किंमत (नियंत्रण ) आदेश -2015, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा -2009, महाराष्ट्र कापुस बियाणे नियम -2010 अन्वये तेल्हारा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, तालुका कृषी अधिकारी भरत चव्हाण, विस्तार अधिकारी गौरव राऊत, कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले आदींचा समावेश होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अकोला शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी मार्गदर्शन केले.

Previous Post

वीजबिलांच्या थकबाकीला चाप लावण्यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर!

Next Post

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सोन्याचे बिस्किट

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले...!

विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या पुरातन मुर्त्या पादुका, बांगड्यांचे तुकडे, नाणी

विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या पुरातन मुर्त्या पादुका, बांगड्यांचे तुकडे, नाणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.