• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आज दहावीचा निकाल होणार जाहीर पाहा तुमचा निकाल एका क्लिकवर

Our Media by Our Media
May 27, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
115 1
0
HSC Result 2022 : बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के
17
SHARES
829
VIEWS
FBWhatsappTelegram

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (दि. 27) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. गेल्यावर्षी 2 जून रोजी निकाल लागला होता. यंदा सहा दिवस अगोदरच बोर्ड निकाल जाहीर करणार आहे.

दहावीचा आज निकाल

  • दहावीचा आज १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर 
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची आज (दि.२७) ११ वाजता पत्रकार परिषद
  •  कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील 1 लाख 30 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

बारावीचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील 1 लाख 30 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विभागात 356 परीक्षा केंद्रे होती. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकपासून विषयनिहाय संपादित केलेले गुण निकालाद्वारे पाहता येणार आहेत. त्याची प्रिंटदेखील काढून घेता येणार आहे. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ आज (दि.२७) ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन या बाबत माहिती देणार आहेत.

या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल

  • https://mahresult.nic.in/
  • https:///sscresult.mkcl.org
  • https:///sscresult.mahahsscboard.in
  • https:///result.digilockar.gov.in

असा पाहा निकाल

वर दिलेल्या अधिकृत लिंकवर तुमचा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी खालील टीप्स फॉलो करा

  • प्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या
  • त्यानंतर होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • लिंक ओपन झाल्यानंतर तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव नोंदवा
  • स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा
  • थोड्या वेळात तुमचं निकाल दिसेल
  • निकाल मिळाल्यावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची छापील प्रत काढून घ्या.
  • विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर मूळ छापील प्रत ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळांमध्ये दिली जाणार आहे.

गुणपडताळणी

ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः च्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छाया प्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शुल्क भरता येणार आहे किंवा तुम्ही तुमच्या शाळांमार्फतही अर्ज करु शकता.

ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.

Previous Post

पूर्व विदर्भ राज्यात सर्वात हॉट पारा ४५ अंशावर

Next Post

येत्या तीन दिवसानंतर देशातील उष्णतेची लाट ओसरणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Temperature-summer (1)

येत्या तीन दिवसानंतर देशातील उष्णतेची लाट ओसरणार

इंग्रजी माध्यमातून किड्स पॅराडाईज तालुक्यातून अव्व्ल तृप्ती खरात इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून प्रथम, यथार्थ चव्हाण दुसरा

इंग्रजी माध्यमातून किड्स पॅराडाईज तालुक्यातून अव्व्ल तृप्ती खरात इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून प्रथम, यथार्थ चव्हाण दुसरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.