• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘ ई-संजीवनी ‘ योजना : ५ हजार ४७२ रुग्णांनी घेतले ऑनलाईन मोफत उपचार

Our Media by Our Media
May 20, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 1
0
‘ ई-संजीवनी ‘ योजना : ५ हजार ४७२ रुग्णांनी घेतले ऑनलाईन मोफत उपचार
13
SHARES
645
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, दमट वातावरण अशा विविध कारणांमुळे प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डोकेदुखी, मळमळ, सर्दी, उलटी किंवा पोटदुखी आदी त्रास जाणवत असेल. तर ई-संजीवनी योजनेअंतर्गत ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी मोफत सल्ला मिळतो. जिल्ह्यात मागील वर्षभरात जवळपास ५४७२ वर रुग्णांनी ऑनलाइन ओपीडीच्या माध्यमातून घरच्या घरी डॉक्टरांचा मोफत सल्ला घेतला आहे.

राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून कोविड काळापासून ही ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू झाली. यासाठी वेबसाइट किंवा अ‍ॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. या पोर्टलवर किंवा अ‍ॅपचा उपयोग करून ऑनलाइन उपलब्ध डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओद्वारे सल्लामसलत करून रुग्ण विनामूल्य सल्ला घेऊ शकतात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ई-संजीवनी ओपीडी मार्फत दंतरोग, त्वचा रोग, शल्यचिकित्सा, मानसिक रोग, मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग, नेत्रचिकित्सा, अस्थिरोग आदी तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी सुविधा दररोज सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी १.४५ ते ५ वाजेपर्यंत सुरू असते. सध्या उन्हाळा व पुढे पावसाळा आहे. अशावेळी उन्हामध्ये किंवा पावसामध्ये आजारी असताना पुन्हा रुग्णालयात भिजत जाण्यापेक्षा या सुविधेच्या माध्यमातूनही रुग्ण आरोग्याचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या माहितीनुसार औषधोपचार घेऊन घरीच ठणठणीत बरे होऊ शकतात. त्यामुळे या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांनी केले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला

एमबीबीएस, एमडी, एमएस, आयुर्वेदिक आदी तज्ज्ञ डॉक्टरच्या उपलब्धतेनुसार रुग्णांना आजारासंदर्भात हा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला मिळतो. संबंधित डॉक्टर ऑनलाइन औषधांचे प्रिस्क्रीप्शनही देतात.

नोंदणी कशी करणार?

मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवरून ई-सजीवनी अ‍ॅप डाउनलोड करा, हे अ‍ॅप वापरण्यासाठी फोन नंबर लागेल, यामध्ये लॉगिनसाठी काही महत्त्वाची माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेशंट रजिस्ट्रेशन / जनरेट टोकन, पेशंट लॉगिन आणि पेशंट प्रोफाइल इत्यादी पर्याय दिसतील. रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, व्यवस्थापन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडीओ सल्लामसलत, ई-उपचार, एसएमस ई-मेल नोटिफिकेशन, डॉक्टरांद्वारे मोफत सेवा, सर्व माहिती (दैनंदिन स्लॉट, डॉक्टर्स, रुग्णालय यांची संख्या, प्रतीक्षा कक्षाची माहिती, कन्सल्टेशन टाइम लिमिट आदी) महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये यात आहेत. विशेष म्हणजे ई-संजीवनी ओपीडीद्वारे राज्य, जिल्हा, गाव इत्यादी कोणत्याही ठिकाणावरून वैद्यकीय अधिकार्यांकडून वैद्यकीय सल्ला व उपचार घेऊ शकतात. हा सल्ला व उपचार घेण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप, संगणक याद्वारे थेट व्हिडीओ कॉल तसेच ई-मेल, एसएमएसद्वारे देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सल्लामसत करता येऊ शकते.

Previous Post

मान्सून अंदमानात धडकला महाराष्ट्रात या तारखेपर्यंत लावणार हजेरी

Next Post

उद्या ठरणार बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, एका क्लिकवर पाहा निकाल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
HSC Result 2022 : बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के

उद्या ठरणार बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, एका क्लिकवर पाहा निकाल

चार वर्षा पूर्वी चोरी गेलेल्या मोटारसायकल चा शहर वाहतूक शाखा अकोला ने लावला शोध

परिवहन विभागाकडून मोहिम वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.