• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मान्सून अंदमानात धडकला महाराष्ट्रात या तारखेपर्यंत लावणार हजेरी

Our Media by Our Media
May 20, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
135 1
0
पाऊस
19
SHARES
974
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : मान्सून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीन दिवस आधीच रविवारी (दि. 19 मे) दुपारी दोनच्या सुमारास अंदमान-निकोबारसह बंगालच्या उपसागराच्या काही भागांत येऊन धडकला. यंदा तो नियोजित तारखेच्या एक दिवस आधी आला. केरळमध्ये त्याचे आगमन 31 मे ते 4 जून यादरम्यान कधीही होऊ शकते, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून हवामान विभागाच्या नियोजित तारखेप्रमाणे दरवर्षी 20 मे रोजी येत असतो. यंदा तो नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच अंदमानात दाखल झाला. पुढे 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात, 25 जून रोजी राजस्थान आणि 6 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात तो पोहोचण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात 18 ते 25 जूनपर्यंत आणि बिहार-झारखंडमध्ये 18 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मान्सून मालदीव आणि कोमोरिनसह दक्षिण उपसागरात प्रवेश केला. निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात तो दाखल झाला. त्यामुळे त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

मान्सूनचे वारे वेगाने सुरुवातीला बंगालच्या उपसागरात ईशान्येकडे सरकून नंतर मध्यवर्ती भागांवर केंद्रित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 मेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात तीव कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून अधिक वेगाने पुढे जाण्यास मदत होईल, असाही अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

या राज्यांत उष्णतेची लाट

राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीच्या अनेक भागांत उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानातील बाडमेर आणि कानपूरमध्ये सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले.

या भागांत पाऊस

केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, उपहिमालयीन रांगा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालयात पाऊस सुरू झाला आहे.

महाराष्ट्रात 25 मेपर्यंत पाऊस

सोमवारपासून (दि. 20 मे) राज्यात सर्वत्र विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे अन् पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गत तीन वर्षांतील मान्सूनची एन्ट्री

2020 मध्ये मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. 2021 मध्ये 3 जून रोजी, तर 2022 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता. 2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

‘ ला निना ’ मुळेयंदा चांगला पाऊस

एल निनो आणि ला निना या हवामानाच्या दोन परिस्थितींचा परिणाम पावसावर होतो. गतवर्षी एल निनो सक्रिय होता, तर या वेळी एल निनो या आठवड्यात आटोपला आहे. येत्या 3 ते 5 आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होणे शक्य आहे. गतवर्षी ‘एल निनो’दरम्यान सरासरीहून कमी म्हणजे 94 टक्केच पाऊस झाला होता.

पावसाची सरासरी काय?

चार महिन्यांच्या पावसाळ्यासाठी दीर्घ कालावधीची सरासरी 86.86 सें.मी. आहे. याचा अर्थ असा की, पावसाळ्यात इतका एकूण पाऊस झाला पाहिजे. यावर्षी सरासरीहून अधिक म्हणजे 106 टक्के (87 सेंमी) पाऊस शक्य आहे.

Previous Post

२० वर्षापासून जोपासलेली ४०० झाडांची फळबाग पाण्याअभावी होरपळली…

Next Post

‘ ई-संजीवनी ‘ योजना : ५ हजार ४७२ रुग्णांनी घेतले ऑनलाईन मोफत उपचार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
‘ ई-संजीवनी ‘ योजना : ५ हजार ४७२ रुग्णांनी घेतले ऑनलाईन मोफत उपचार

' ई-संजीवनी ' योजना : ५ हजार ४७२ रुग्णांनी घेतले ऑनलाईन मोफत उपचार

HSC Result 2022 : बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के

उद्या ठरणार बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, एका क्लिकवर पाहा निकाल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.