• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

पालकांनो, मुलांना पोहायला शिकवा…! वाढत्या दुर्घटनांमुळे पोहण्याचे धडे काळाची गरज

Our Media by Our Media
May 15, 2024
in Amravati, Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
85 1
0
Swimming Players
12
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

एम्प्रेस गार्डन ते शिंदेवस्ती व पुढे वैदूवाडी परिसरातून वाहणार्‍या नवीन कालव्यात मागील महिनाभरात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभाग तसेच पालकांनीही मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. बुडालेल्या मुलांना पोहता येत असते, तर या दुर्घटना टाळल्या असत्या. यानिमित्ताने पालकांनी मुलांना पोहायला शिकवणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

पूर्वी विहिरीमध्ये मुलांना पोहायला शिकवले जात होते. मात्र, उपनगरांमध्ये वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे विहिरी शिल्लक राहिल्या नाहीत. कालव्यामध्ये पोहणेही धोकादायक आहे. त्यामुळे मुलांना पोहायला कुठे शिकवायचे? असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबातील पालकांपुढे उभा राहत आहे. पूर्वी पालक दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयांतील मुलांना उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावाकडे पाठवत होते. गावाकडे विहिरींमध्ये मुले पोहायला शिकत होती. मात्र, आता पालक मुलांना गावाकडे पाठवण्याऐवजी शिबिर किंवा पुढच्या वर्गाच्या अभ्यासामध्ये गुंतवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वास्तविक, शाळा-महाविद्यालयांमध्ये छोटेखानी स्वीमिंग टँक (जलतरण तलाव) उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे मुलांना पोहण्याचे प्राथमिक धडे शाळेतच मिळतील आणि असे अनर्थ टाळण्यास मदत होईल. सहलीला गेल्यानंतर समुद्रकिनार्‍यावर पाण्यामध्ये डुंबताना अनेक मुले बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने शालेय स्तरावरच पोहण्याचे धडे दिले, तर पुढील अनर्थ टाळण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. महापालिकेने शहर आणि परिसरामध्ये प्रत्येक विभागातील शाळेमध्ये जलतरण तलाव उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांनीही प्रशिक्षकामार्फत मुलांना पोहण्याचे धडे देण्याबरोबरच पोहण्यासाठी सुविधाही उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

जलतरण तलावांची संख्या वाढवा

उपनगरा परिसरात जलतरण तलावांची वानवा आहे. उपलब्ध असलेल्या तलावांपैकी अनेक तलाव बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे मुले पोहण्यासाठी कालव्याचा आधार घेत आहेत. कालव्यामध्ये पोहणे धोकादायक असल्याने खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने जलतरण तलावांची संख्या वाढवून ते कमी शुल्कामध्ये मुलांना पोहण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Previous Post

शाळांचा परिसर तंबाखूमुक्त असणे आवश्यक – जिल्हाधिकारी अजित कुंभार

Next Post

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हा आहे सर्वात महागडा आंबा..!

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय

मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.