• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जात प्रमाणपत्र खोटे तरीही विद्यार्थिनीची MBBS पदवी कायम!

Our Media by Our Media
May 13, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
453 5
0
उच्च न्यायालय : संमतीने शरीर संबंधानंतर लग्‍नास नकार ही फसवणूक नव्हे
65
SHARES
3.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

प्रवेशावेळी खोटे ओबीसी-नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करुन एमबीबीएस पदवी घेतलेल्‍या विद्यार्थिनीला मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तिची पदवी रद्द करू नये, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

एका विद्यार्थिनीने २०१२ मध्‍ये खोटी माहिती देऊन ओबीसी-नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्राच्या आधारे मुंबईतील एका महाविद्यालयात एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. याविरोधात तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशी झाली. विद्यार्थिनीच्‍या वडिलांनी खोटी माहिती देऊन ओबीसी-नॉन-क्रिमी लेयर माणपत्र मिळवल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. समितीला विद्यार्थिनीच्‍या वडिलांच्‍या वैवाहिक स्थिती आणि उत्पन्नाबाबतच्या विधानांमध्येही विसंगती आढळून आली. 2008 मध्ये पत्नीला घटस्फोट दिल्याचा दावा करूनही त्यांनी सांगितले होते ते त्यांच्या मुलांसाठी एकत्र राहतात. हे कारण चौकशी समितीने विरोधाभासी मानले. याचिकाकर्त्याच्या वडिलांनी आपल्या पत्नीच्या नोकरीच्या स्थितीचे चुकीचे वर्णन केले. दावा केला की, तिला कोणतेही उत्पन्न नाही, तर प्रत्यक्षात विद्यार्थिनीची आई महामंडळात नोकरीला होती. चौकशी अहवालाच्या आधारे, कॉलेज प्रशासनाने 8 ऑक्टोबर 2013 रोजी संबंधित प्रमाणपत्र रद्द केले. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2014 रोजी याचिकाकर्त्याचा प्रवेश रद्द करण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विद्यार्थिनीची उच्‍च न्‍यायालयात धाव, अभ्‍यासक्रम सुरु ठेवण्‍याची परवानगी

विद्यार्थिनीने 5 फेब्रुवारी 2014 रोजी एमबीबीएस प्रवेश रद्द करण्याच्‍या निर्णयाला उच्‍च न्‍यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने तिला अंतरिम दिलासा देत एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, न्यायालयाने संबंधिताला ओबीसी प्रवर्गाचे लाभ मिळण्यास मज्जाव केला होता.

काय म्‍हणाले मुंबई उच्‍च न्‍यायालय?

विद्यार्थिनीच्‍या याचिकेवर न्यायमूर्ती ए एस चांदूरकर आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, “तिच्या पालकांनी तिला ओबीसी-नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करुन प्रवेश मिळवून देण्यासाठी अवलंबलेल्या ‘अयोग्य पद्धती’ होती. मात्र आता संबंधित विद्यार्थिनी पदवी रद्द केली तर देश आणखी एका पात्र डॉक्‍टरपासून वंचित राहिल. लोकसंख्येच्या तुलनेत आपल्या देशात फार कमी डॉक्टर्स आहेत. त्‍यामुळे त्यांच्या पदव्या काढून घेतल्यास राष्ट्रीय नुकसान होईल. कारण आपण डॉक्टरांपासून वंचित राहू. आता संबंधित विद्‍यार्थीने एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे त्याचा प्रवेश रद्द करू नये,” असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

कोणत्याही विद्यार्थ्याने आपला पाया खोटेपणावर बांधू नये

संबंधित विद्यार्थिनीचे ओबीसी प्रवर्गातील नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र रद्द करण्यात मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय योग्‍यच होता, असे स्‍पष्‍ट करत वैद्यकीय व्यवसाय हा खोट्या माहितीच्या पायावर उभा असेल तर तो नक्कीच उदात्त पेशावर कलंक ठरेल. कोणत्याही विद्यार्थ्याने आपला पाया खोटेपणावर बांधू नये, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.

या टप्‍प्‍यावर पदवी मागे घेणे योग्य होणार नाही

न्‍यायालयाच्‍या अंतरिम आदेशांच्या आधारे विद्यार्थिनीने तिचा अभ्यासक्रम सुरू ठेवला आणि 2017 मध्ये पूर्ण केला, आता तिला पदवी प्रदान केली जावी. या टप्प्यावर याचिकाकर्त्याने मिळवलेली पात्रता पदवी मागे घेणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित विद्यार्थिनीला खुल्‍या प्रवर्गातील विद्यार्थी म्हणून अभ्यासक्रमाचे शुल्क तीन महिन्यांत भरण्याचे निर्देश दिले आहेत. तसच कॉलेजला 50,000 रुपये अतिरिक्त रक्कम भरण्यास सांगितले आहे.

Previous Post

काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी या भागात ‘ यलो अलर्ट ’ जारी

Next Post

यंदा मान्सूनचे आगमन लवकर….

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अलर्ट मोडवर

यंदा मान्सूनचे आगमन लवकर....

जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

शाळांचा परिसर तंबाखूमुक्त असणे आवश्यक - जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.