गर्भवती असतानाच त्यांनी होणार्या अपत्यासह दीक्षा घेण्याचा संकल्प केला होता. आता तब्बल ११ वर्षांनी त्यांनी संन्यस्थ आश्रमाचा स्वीकार करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. कर्नाटकमधील व्यावसायिक महेश यांची पत्नी स्वीटी यांनी आपला ११ वर्षांचा मुलगा हृदन याच्यासह दीक्षा घेतली आहे. ३० वर्षीय स्वीटी या कर्नाटकमधील व्यावसायिक मनीष यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या ११ वर्षांच्या मुलासह दीक्षा घेत संन्यस्थ आश्रमाचा स्वीकार केला आहे. दीक्षा घेतल्यानंतर स्वीटी यांचे नामाकरण भवशुधि रेखा श्री जी आणि मुलाचे बेनिताशी रतनविजय जी करण्यात आले आहे.
स्वीटी यांच्या नातेवाईक विवेक यांनी सांगितले की, भावशुद्धी रेखा श्री जी गरोदर होत्या तेव्हाच त्यांनी संन्यस्थ आश्रमाचा स्वीकारण्याचा संकल्प केला होता. त्यांनी ठरवले होते की, स्वत:सह त्यांचे मूल त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जैन भिक्षू बनेल. संन्यस्थ आश्रमाचा स्वीकार करण्याचा मानस करतच त्यांनी आपल्या मुलाचे पालन पोषण केले होते. भावशुद्धी रेखा श्री जी यांच्या निर्णयाचे पती मनीष यांनी समर्थन केले. मनीष आणि इतर कुटुंबातील सदस्यांना या निर्णयाचा अभिमान असल्याचे म्हटलं आहे. जानेवारी 2024 मध्ये गुजरातमधील सुरत येथे आई आणि मुलाचा दीक्षा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघेही आता सुरतमध्ये राहतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर दीक्षघ सोहळ्यचा भावनिक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरातमधील उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करुन सांसारिक आसक्ती सोडून दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे भावेश यांचा १६ वर्षांचा मुलगा आणि १९ वर्षांच्या मुलीने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली आहे. मुलांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.