• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शास्त्री क्रीडांगणावर निनादले ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ’ चे सूर महाराष्ट्रदिन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा

Our Media by Our Media
May 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
86 1
0
शास्त्री क्रीडांगणावर निनादले ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ’ चे सूर महाराष्ट्रदिन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा
12
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.1: विविध दलांचे शानदार पथसंचलन, राष्ट्रगीत व राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चे आसमंतभर निनादणारे सूर, महाराष्ट्रातील वीरमाता, वीरपत्नी व अनेक मान्यवरांची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात महाराष्ट्रदिनाचा शासकीय समारंभ येथील लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर आज  साजरा करण्यात आला.

प्रारंभी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.  कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसेवेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या व शौर्य गाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांचे कुटुंबिय, वीरमाता, वीरपत्नी सोहळ्याला उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्या जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, महिला पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल आदी पथकांनी शानदार पथसंचलन केले. परेड कमांडर गणेश जुमनाके, सेकंड परेड कमांडर गोविंद साबळे, पीएसआय संदीप बलोदे, निता दामधर, चतरसिंग सोळंके, विजयसिंग डाबेराव व नीलेश गाडगे आदींनी विविध पथकांचे नेतृत्व केले.

पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सुनील पवार, काझी मोहम्मद फजलुर रहेमान,  विनय जाधव, अनिल टोपकर, सतीश फोकमारे, ज्ञानेश्वर सैरिसे, अ. फईम शेख चांद, सुनील राऊत, मंगेश महल्ले, विलास बंकावार, साजिद खालिक अब्दुल आदींना यावेळी गौरविण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त रवीशंकर पाली यांचाही गौरव झाला. नीलेश गाडगे यांनी शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

Next Post

उष्णतेमुळे विजेची मागणी ५ हजार मेगावॅटने वाढली..!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
महानिर्मिती

उष्णतेमुळे विजेची मागणी ५ हजार मेगावॅटने वाढली..!

‘संकल्‍पपूर्ती’..! ११ वर्षांच्‍या मुलासह आईने घेतली दीक्षा!

'संकल्‍पपूर्ती'..! ११ वर्षांच्‍या मुलासह आईने घेतली दीक्षा!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.